कोरोना काळात सेवा न देणाऱ्या खासगी डॉक्टरवर कारवाई करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०६ मे २०२१

कोरोना काळात सेवा न देणाऱ्या खासगी डॉक्टरवर कारवाई करा

मुख्यमंत्री आरोग्य मंत्री यांना निवेदन - काँ. राजू गैनवार

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)-
करोना च्या दुसऱ्या लाटेत अवघ्या जगाला आपल्या कवेत घेतले आहे.याचा प्रादुर्भाव आपल्या देशात सुद्धा आहे त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर आणि इतर 24 तास अविरत सेवा देत आहे. एकीकडे असे चित्र असताना या शहरातील काही डॉक्टरांनी आपले रुग्णालय बंद करून बाहेर पळ काढला आहे . अशा डॉक्टरांन वरती कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड राजू गैनवार यांनी मुख्यमंत्री ,आरोग्य मंत्री यांच्याकडे केली आहे.

 या संकटाच्या काळात येथील डॉक्टर विवेक शिंदे डॉक्टर वैभव शिंदे यांनी आपल्या रूग्णालयात को वीडचे सेंटर उभारून सेवा देणे सुरू केले आहे. तसेच आपली बाह्य रुग्ण सेवा मुफ्त देवन रूग्णांना सहकार्य करीत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रविंद्र शिंदे यांनी आपल्या मंगल कार्यालयात 100 खाटांचे कोवीड सेंटर उभारून येथे रुग्णाला मोफत भोजन देऊन अशा कठीण परिस्थितीत समाज सेवेचा विडा हाती घेतला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.  या शहरातील डी एच एम एस, बीएएम एस, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक डॉक्टर सुद्धा कमी दरा मध्ये रुग्णांना सेवा देत आहे त्यांच्याच या जोरावर अनेक रुग्णांना या जीवघेण्या विषाणूचा काळात इतर आजारातून बाहेर काढण्याचे काम केल्या जात आहे.त्यांनी आपली सेवा बंद ठेवली असती तर हाहाकार माजला असता. हे डॉक्टर सेवा देत असताना दुसरीकडे मात्र विरुद्ध चित्र आहे या शहरातील नामांकित आणि उच्च विद्याविभूषीत काही डॉक्टर मात्र आपले रुग्णालय बंद करून बाहेर गेले आहे. डॉक्टर प्रती देव समजले जाते. जसे ते सुखात हवे असते तसे दुःखात सुद्धा त्यांनी साथ दिली पाहिजे परंतु हे देवरूपी समजले जाणारे डॉक्टर आपल्या रुग्णालयाचे दरवाजे बंद करून पसार झाले आहेत अशा सेवा न देणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री ,आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे कॉम्रेड राजू गैनवार यांनी केली आहे.