पहिला डोस घेतलेल्याना दुसरा डोस तात्काळ द्या - खासदार बाळू धानोरकर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ मे २०२१

पहिला डोस घेतलेल्याना दुसरा डोस तात्काळ द्या - खासदार बाळू धानोरकर

 पहिला डोस घेतलेल्याना दुसरा डोस तात्काळ द्या 


खासदार बाळू धानोरकर यांची जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे मागणी  


चंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना विषाणूमुळे मृत्यू पडणाऱ्याचे प्रमाण देखील वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावा पासून बचाव करण्यासाठी लस हाच एकमात्र पर्याय आहे. लसीच्या पहिला डोस अनेक नागरिकांनी घेतला आहे. परंतु दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक दिवस सकाळी ५ वाजता रांगेत लागून देखील त्यांना लस मिळत नसल्याने नाहक त्रासाला समोरे जावे लागत आहे. त्यामुळे पहिला डोस घेतल्याना स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारून दुसरा डोस तात्काळ द्या अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केली आहे. 
                   मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा तासंतास वाट बघत हजारो लोक लसीकरण केंद्राच्या बाहेर उभे राहत असतात. हे लसीकरण केंद्र जणू कोरोना विषाणूच्या प्रसार होणारे केंद्र आहे कि काय असा प्रश्न अनेकदा निर्माण होत आहे. अनेकदा तासंतास उभे राहून देखील लस उपलब्ध होत नसल्याने निराश होऊन घरी परत जावे लागत आहे. परंतु त्यात पहिला डोस घेतणाऱ्या नागरिकांना ४५ दिवस लोटून देखील दुसरा डोस मिळत नसल्यामुळे आता करायचे काय असा प्रश्न पडला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोसला खूप उशीर होत असल्याने जिल्ह्यातील इतर लसीकरण केंद्राच्या आधार अनेक नागरिक घेत आहे. मात्र सामान्य माणूस दुविधेत पडला आहे. त्यामुळे त्वरित हा प्रश्न मार्गी लावण्याकरिता तात्काळ दुसऱ्या डोस घेण्याकरिता स्वतंत्र केंद्र उभारण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केली आहे.  
Attachments area