कोरोना काळात गरजु नागरिकांना शिधापत्रिका काढून देण्याचा उपक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ मे २०२१

कोरोना काळात गरजु नागरिकांना शिधापत्रिका काढून देण्याचा उपक्रम


उपमहापौर राहुल पावडे यांचा पुढाकार


चंद्रपूर : कोरोना काळात नागरिकांना बाहेर निघने कठीण झाले असता गरजु नागरिकांना अन्न धान्याचा प्रश्न निर्माण झाला. शिधा पत्रिका काढण्यासाठी तहसिल कार्यालयात जावून काढवे लागत असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत होता. नागरिकांची गैरसोय बघताच चंद्रपुर महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे यांनी गरजु नागरिकांना शिधा पत्रिका काढून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
कोरोना महामारीने गेल्या वर्षाभरापासून गरजु नागरिकाच्या हातचा रोजगार गेला असून काहींवर उपासमारीची पाळी आली होती. या संदर्भात शिधा पत्रिका नसलेल्या नागरिकांना सुध्दा अन्न धान्य देण्यात यावे बाबतचे पत्र माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उपमहापौर राहुल पावडे यांनी दिले होते.
सदर उपक्रम कोरोना काळापासून राहुल पावडे यांच्या कार्यालयातून राबविण्यात येत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या काळात अन्न धान्याची किट सुध्दा उपलब्ध करून देण्यात आली. सदर उपक्रम राबवित असल्यामुळे नागरिका मध्ये समाधान व्यक्त होत आहे. ज्यांना कुणाला शिधा पत्रिका काढयाचे असेल त्यांना राहुल पावडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.