स्व. राजीव गांधी हे तंत्रयुगातील महान नेता : दिलीप पनकुले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ मे २०२१

स्व. राजीव गांधी हे तंत्रयुगातील महान नेता : दिलीप पनकुले
स्व. राजीव गांधी हे तंत्रयुगातील व युवकाचे प्रेरणास्थान असलेले महान नेते होते. भारतासारख्या प्रगतीशील देशात राजीव गांधी यांचा सिंहाचा वाटा असून त्यांचा बलिदान हा देश कधीही विसरू शकणार नाही असे मनोगत आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्य राजीव गांधी चौक (अजनी चौक) वर्धा रोड येथे स्थापन केलेल्या पूर्णाकृती पुतळ्याला श्रद्धांजली वाहताना दिलीप पनकुले यांनी व्यक्त केले. राजीव गांधी हे तंत्रयुगातील महान नेता होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे बलिदान दिन साजरा करण्यात आला. ह्या प्रसंगी शहर अध्यक्ष अनिलजी अहिरकर राष्ट्रवादीचे माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रदेश उपाध्यक्ष बजरंगसिंह परिहार, प्रदेश सेवादल कार्याध्यक्ष जानबा मस्के, भाईजी मोहोड प्रल्हाद वरोकर, श्रावण हर्षे, प्रशांत लांडगे रामभाऊ धुर्वे, बबलू चौहान, मंदार हर्षे, मच्छिंद्र आवळे, विजय मसराम, सूरज बोरकर, राजेश टेंभुर्णे प्रामुख्याने उपस्थित होते.