गावस्तरावरील विलगीकरण केंद्र रुग्णांना नवसंजीवनी ठरणार - आमदार प्रतिभाताई धानोरकर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ मे २०२१

गावस्तरावरील विलगीकरण केंद्र रुग्णांना नवसंजीवनी ठरणार - आमदार प्रतिभाताई धानोरकर

 गावस्तरावरील विलगीकरण केंद्र रुग्णांना नवसंजीवनी ठरणार :- आमदार प्रतिभाताई धानोरकर
चंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या देखील वाढत आहे. ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. चंद्रपूर येथे ऑक्सिजन बेड मिळत नसल्यामुळे नातेवाईकांना मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावस्तरावर विलगीकरण केंद्र   उभारून प्राथमिक उपचार  देऊन अनेक कोरोना बाधित बरे होणार आहे. येत्या काळात गावस्तरावरील विलगीकरण केंद्र  रुग्णांना नवसंजीवनी ठरणार आहे. अशी प्रतिक्रिया आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली. त्या वरोरा, भद्रावती तालुक्यातील विलगीकरण केंद्राच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.  

                           वरोरा तालुका अंतर्गत मौजा माढेळी, नागरी,  टेमुडा, शेगाव व भद्रावती तालुका अंतर्गत मौजा चंदनखेडा, मुधोली, घोडपेठ, नंदोरी बु., माजरी येथे  खासदार बाळुभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे माध्यमातून ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कोविड विलगीकरण केंद्र 25 बेडचे  उद्घाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर याचे हस्ते करण्यात आले.  चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.  परिणामी रुग्णांवर अपु-या वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे उपचार होत नसल्याने रुग्णांच्या  जिव वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. ग्रामीन भागातील गरजू कोरोना रुग्णांची गरज लक्षात घेता हे विलगीकरण केंद्र रुग्णांना नवसंजीवनी ठरणार आहे,
                 
                उद्घाटन प्रसंगी  उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसिलदार वानखेडे बेडसे ,  संवर्ग विकास अधिकारी,  तालुका आरोग्य अधिकारी मुंजनकर, मंडळ अधिकारी, तसेच पंचायत विभाग व आरोग्य विभाग कर्मचारी व गावकरी उपस्थित होते. तर भद्रावती येथील कोरोना विलगीकरण केंद्राचे देखील उदघाटन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार शितोडे,  संवर्ग विकास अधिकारी आरेवार, तालुका आरोग्य अधिकारी आसुटकर, मंडळ अधिकारी तसेच पंचायत विभाग व आरोग्य विभाग कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.