अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर संभ्रम : आज मंत्रीमंडळ बैठकीत चर्चेची शक्यता - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०५ मे २०२१

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर संभ्रम : आज मंत्रीमंडळ बैठकीत चर्चेची शक्यता
मंगेश दाढे
नागपूर : दरवर्षी होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा कोरोनामुळे होणार किंवा नाही, यावर संभ्रम कायम आहे. आज मुंबई मध्ये होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात बदल्या करू नये, असा सरकारचा मानस आहे. त्यामुळे कोरोनाच्या कामकाजावार परिणाम होय शकतो. मात्र, असे असताना काही विभागात बदल्या करण्यात आलेल्या आहेत. पण, एकाच ठिकाणी तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची बदली व्हावी, अशी काही मंत्र्यांची इच्छा असल्याचे समजते. तर, काही मंत्र्यांना त्यांच्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांना मुदतवाढ हवी आहे. यावर खल होण्याची शक्यता आहे.

'वन, पशुसंवर्धन'साठी वेगळे नियम?

काही दिवसांपूर्वी वनविभागात 27 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. तर, पशुसंवर्धन विभागातील सहायक आयुक्त पदाच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे कोरोना काळात अनेक वनअधिकाऱ्यांची नियुक्ती नोडल अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. अन्य विभागात बदल्या सुरु नसताना वन, पशुसंवर्धनसाठी वेगळे नियम का, असा सवाल उपस्थित होत आहे.