अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध : लग्नाचे आमिष देऊन अत्याचार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०२ मे २०२१

अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध : लग्नाचे आमिष देऊन अत्याचार

लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचारशिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) : 

तालुक्यातील नागलोन येथे राहणाऱ्या  अल्पवयीन मुलीला  लग्नाचे आमिष दाखवून  अत्याचार केल्याची घटना घडली याप्रकरणी माजरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

अमोल पंढरी शेंडे वय 25 राहणार नागलोन असे आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी व आरोपी यांचे चार वर्षापासून प्रेम संबंध होते. यातूनच आरोपीने लग्नाचे आमिष देऊन  अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. व या घटनेनंतर जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली यावरून पीडित मुलीने माजरी पोलिसात तक्रार दाखल केली आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास ठाणेदार विनीत घागे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.