गोंदिया जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ मे २०२१

गोंदिया जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन

गोंदिया जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन


आज दुपारी ३.०० वाजता आयोजनसंजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि. 13 मे:-

गोंदिया जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी बंधु भगिनी साठी आज दि . १३ मे रोज गुरुवारला दुपारी ३.०० वाजता हळद उत्पादनाबाबत तज्ञ मार्गदर्शक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आज दुपारी ३.०० वाजता हळद ऊत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रीया या बाबत डॅा जितेंद्र कदम , सहयोगी प्राध्यापक , काढणी पश्चात व्यवस्थापन पदवुत्तर महाविध्यालय , किल्ला रोहा , जि रायगड व डॅा संजय भोयर , डॅा पंदेकृवि अकोला तांत्रीक मार्गदर्शन करनार आहेत. डॅा विलास खर्चे , संशोधन संचालक , डॅा . नागरे , सहयोगी अधिष्ठाता , डॅा पंदेकृवि अकोला आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषी तज्ञ डॉक्टर उषा डोंगरवार साकोली ऊपस्थीत राहुन मार्गदर्शन करनार आहेत .कृपया मायक्रोसाफ्ट टिम ॲप डाऊनलोड करावा व निशुल्क वेबीनार मधे सहभागी व्हावे. असे आवाहन गोंदिया जिल्ह्यातील हळद उत्पादक व उत्पादन घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य व प्रयोगशील शेतकरी किशोर तरोणे यांनी केले आहे. खालील लिंकला स्पर्श करून करून शेतकऱ्यांनी या ऑनलाईन मार्गदर्शनात शेतकऱ्यांना उपस्थित राहता येणार आहे.

https://teams.microsoft.com/l/meetup-join/19%3a8428db39743a437f901a81a48a0356dd%40thread.tacv2/1620817820667?context=%7b%22Tid%22%3a%22143df5f0-653b-4f61-9647-0c2ad3f4823f%22%2c%22Oid%22%3a%22d554c05e-40e2-4ffc-8a61-11463e4db875%22%7d