नवेगावबांध ग्रामवासीयांच्या आरोग्याची काळजी, वाहतुक पोलीस करतात जीवाचे रान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०२ मे २०२१

नवेगावबांध ग्रामवासीयांच्या आरोग्याची काळजी, वाहतुक पोलीस करतात जीवाचे रान

नवेगावबांध ग्रामवासीयांच्या आरोग्याची काळजी, वाहतुक  पोलीस करतात जीवाचे रान


दुकानांची वेळ वाढवावी किराणा व भाजीपाला विक्रेत्यांची मागणी


नवेगावबांध पोलीस ठाणे ॲक्शन मोडवर
संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.2 मे:-


गोंदिया जिल्ह्यात वाढत्या कोरोना विषाणू वर आळा घालण्यासाठी होणारी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी, जिल्हा प्रशासनने 15 मे च्या सकाळी सात वाजे पर्यंत ब्रेक द चैन याअंतर्गत  कडक निर्बंधासह लॉक डाऊन ची मुदत वाढविली आहे. स्थानिक ग्रामपंचायत ने सुद्धा दवंडी द्वारे ब्रेक द चैन याअंतर्गत कडक निर्बंधासह लागू केलेला लॉक डाऊन ग्रामवासियांनी यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. या लसीकरण केंद्रांवर जाऊन नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी ग्रामवासीयांना केले आहे. नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर फिरू नये.कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्यासाठी प्रशासन येथील ग्रामवासियांना वारंवार आवाहन करीत आहे. तर अत्यावश्यकसेवेतील किराणा व भाजीपाला दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू राहतात त्यामुळे नागरिकांना व दुकानदारांनाही पुरेसा वेळ मिळत नाही. चार तास दुकाने सुरू राहतात. ही अपुरी वेळ असल्यामुळे, सध्या असलेली ही वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत वाढविण्यात यावी. असे मागणी काही भाजीपाला व किराणा विक्रेत्यांनी केली आहे. मागील महिन्यात नवेगावबांध येथे 58 व्यक्ती पॉझिटिव आढळले होते. आत्ता कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. आज घडीला गावात बाधितांची संख्या आठ आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे विलगीकरण ची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु बाधित व्यक्ती गृह विलगीकरनात राहने पसंत करीत आहेत. घरी पुरेशा सुविधा नसल्यामुळे गृह विलगीकरणा चे नियम पाळले जात नाही. त्यामुळे गावात संसर्ग पसरण्याची भीती काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. ज्यांच्या हाती कायदा व सुव्यवस्था सुरक्षित ठेवण्याची  जबाबदारी आहे

 ते पोलीस प्रशासन रखरखत्या उन्हात आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्यच्या दृष्टीने कोरोना ची वाढती साखळी तोडण्याकरिता संचार बंदीचे कुठेही उललंघन होऊ नये, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,गर्दी करू नये, आरोग्य संबंधित अत्यावश्यक सेवा वगळून इतर अत्यावश्यक सेवांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आहे.ती वेळ पाळली जावी,त्याचे उल्लंघन होऊ नये, परवानगी नसलेले दुकाने सुरू नसावी. यासाठी नवेगावबांध पोलीस स्टेशन चे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांच्यासह, पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख , पोलीस कर्मचारी उन्हातान्हाची पर्वा न करता, वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी, संचार बंदीचे उल्लंघन होऊ नये. यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. संचार बंदीच्या काळात काही टवाळखोर गावात विनाकारण फिरतात, तर काही रस्त्याच्या कडेला बसून राहतात. यांच्यावर  वचक बसविण्याचे काम पोलिस करीत आहेत. गावात तसेच पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचार बंदीचे उल्लंघन होऊ नये. यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे परिसरात वाढती कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. परिसरातील ग्रामवासीयांसाठी पोलीस प्राणदूत ठरत आहेत. नागरिकांनीही संचार बंदीचे उल्लंघन न करता पोलिसांना व प्रशासनाला सहकार्य करावं,असं आवाहन ठाणेदार जनार्दन हेगडकर यांनी केले आहे.