कोरोना नियंत्रणासाठी दीडशे अधिकऱ्यांची फौज - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ मे २०२१

कोरोना नियंत्रणासाठी दीडशे अधिकऱ्यांची फौज

नागपूर हायकोर्टात सरकारची माहिती 


नागपूर : नागपूर शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जवळपास दीडशे अधिकारी कार्यरत असतील, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खडपीठात राज्य सरकारने आज मंगळवारी दिली. यात अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,नायब तहसीलदार,अन्न व औषध अधिकारी,वनपरिक्षेत्राधिकारी अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दिमतीला मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, वरिष्ठ/कनिष्ठ लिपिक असतील. 


ऑक्सिजन, रेमडेसिवीरवर लक्ष

नागपूर शहरासाठी मनपाच्या इमारतीत समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्या रुग्णाला ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि बेडची गरज आहे. याची माहिती नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना द्यावी लागेल. यामुळे रुग्णांची होणारी धावपळ थांबणार आहे.तसेच रेमडेसिवीर, ऑक्सिजन किती आहे आणि कुठे गरज आहे, याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दररोज नियुक्त अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक आहे, असेही सरकारने न्यायालयात स्पष्ट केले.