कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात आजपासून वीज खात्यात बेमुदत काम बंद आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ मे २०२१

कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात आजपासून वीज खात्यात बेमुदत काम बंद आंदोलनसहा सघंटना कृती समितीचे महाराष्ट्रातील केंद्रीय प्रमुख पदाधिकारी यांची दि.२१.०५.२०२१ रोजी व्हिडिओ काॕन्फरन्स व्दारे आॕनलाईन बैठक दुपारी संपन्न झाली.या बैठकीत राज्य सरकारने फ्रंटवर काम करणाऱ्या वीज कामगार,अभिंयते, अधिकारी व कंञाटी कामगार याना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा दयावा व तात्काळ लसीकरण करावे,मेडिक्लेम पाॕलीसी करीता कामगार सघंटनाना विश्वासात न घेता नेमलेला टिपीए तात्काळ बदलावा इत्यादी मागण्या व आदोंलन कसे सघंटीत करावे या बाबत सहा सघंटनाचे केंद्रीय पदाधिकारी यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. या बैठकीत राज्य सरकार व तिन्ही कंपन्याचे व्यवस्थापन यांच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात दि.२४.०५.२०२१ पासुन पुकारलेले बेमुदत काम बंद आदोंलन संघटीत करण्यासाठी पूर्ण ताकतीने एकजुटीने कामाला लागण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीत राज्यभरातील शेकडो कामगार पदाधिकारी उपस्थित होते.
काय आहेत मागण्या :-
*****************
१) वीज कामगार,अभिंयते व अधिकारी तसेच कंञाटी कामगार याना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देवुन शासना प्रमाणे सर्व सुविधा द्याव्यात.
२) फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन वीज कामगार,अभिंयते,अधिकारी व कंञाटी कामगार,सर्व सहाय्यक,वीज सेवक व प्रशिक्षणार्थी यांचे व त्यांच्या कुटूंबातील सर्व सदस्यांचे प्रथम लसीकरण करावे.
३) कोविद-१९ मुळे मृत्यु पावलेल्या वीज कामगारांना महाराष्ट्र शासना प्रमाणे रु.५० लाख अनुदान दयावे.
४) तिन्ही कंपन्याकरीता एम.डी.इंडिया या जुन्याच टिपीए ची तात्काळ पुन्हा नेमणूक करावी.
५) कोविद-१९ आजाराचा महाराष्ट्रात उद्रेक पाहता वीज बिल वसुली करीता विज कामगारांवर सक्ती करु नये.
६) ए जी मॅपींगची कोणतीही कामे संपा दरम्यान करु नयेत.
७) फिडर सेपरेशनची (गावठाण व एजी) सुध्दा कामे संपा दरम्यान करु नयेत.
आपले विनित
१) काॕ.मोहन शर्मा अध्यक्ष व काॕ.कृष्णा भोयर सरचिटणिस (महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन-आयटक)
२) श्री.जयप्रकाश होळीकर अध्यक्ष व श्री.शंकर पहाडे सरचिटणिस (महाराष्ट्र वीज कामगार महासंघ-बिएमएस)
३) श्री.रवी बारई अध्यक्ष व श्री.आर.टी.देवकांत सरचिटणिस (विघुत क्षेत्र तांञिक कामगार युनियन)
४) अभि.केदार रेडेकर अध्यक्ष व अभि.सजंय ठाकूर सरचिटणिस (सबाॕर्डिनेट
इंजिनियर अशोसिएशन)
५) श्री.एन.के.मगर अध्यक्ष व श्री.सय्यद जहिरोद्दीन सरचिटणिस (महाराष्ट्र राज्य वीज तांञिक कामगार संघटना)
६) श्री.जयप्रकाश छाजेड अध्यक्ष व श्री.दत्ताञय गुट्टे मुख्यमहासचिव (महाराष्ट्र राज्य वीज कामगार काॕग्रेस-इंटक)