मेधा किरीट यांच्या ‘सखी सूत्र’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन संपन्न - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१६ मे २०२१

मेधा किरीट यांच्या ‘सखी सूत्र’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

 मेधा किरीट यांच्या सखी सूत्र’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन संपन्न 

            मुंबई,दि.14 : देशाच्या राजकीय पटलावरील अनेक नेत्यांच्या सहचारिणींचे स्वतःचे कार्यकर्तृत्व तसेच संबंधित नेत्यांच्या यशात असलेले योगदान उलगडून दाखविणाऱ्या सखी सूत्र’ या मेधा किरीट सोमैया यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या हिंदीमराठी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.

            कार्यक्रमाला आभासी माध्यमातून माजी राज्यपाल राम नाईकलोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजनमाजी खासदार किरीट सोमैया हे उपस्थित होते. तर राजभवन येथे प्रत्यक्ष कार्यक्रमाला मेधा किरीटनयना विनय सहस्रबुद्धेइंकिंग इनोव्हेशनचे आनंद लिमयेरतन शारदा व विवेकच्या संपादिका अश्विनी मयेकर आदी उपस्थित होते.

            सखी सूत्र’ या पुस्तकातून लेखिका मेधा किरीट यांनी कौटुंबिक तसेच राष्ट्रीयतेचा भाव जागविला असून सहज सुलभ भाषेत विविध नेत्यांचे तसेच त्यांच्या सहधर्मचारिणींचे कार्य दर्शविले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून एका व्यक्तीला जरी प्रेरणा मिळाली तरी देखील हे पुस्तक यशस्वी आहेअसे उद्गार राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी काढले. 

            साप्ताहिक विवेक मध्ये मेधा किरीट यांच्या प्रकाशित झालेल्या सखी सूत्र’ या स्तंभातील लेखांचे संकलन असलेल्या या पुस्तकामध्ये श्रीमती उषा व उपराष्ट्रपती वेंकय्या नायडूडॉ. प्राची व प्रकाश जावडेकरनीलम व राजीवप्रताप रुडीसीमा व पियुष गोयलकांचन व नितीन गडकरीयांसह भाजपचे कार्याध्यक्ष जे पी नडडाडॉ विनय सहस्रबुद्धेडॉ अनिल सहस्रबुद्धेडॉ सत्यपाल सिंहडॉ विजय चौथाईवाले डॉ. हर्षवर्धन आदी नेत्यांचा कौटुंबिक जीवनपट दाखविण्यात आला आहे.