महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ मे २०२१

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

 महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन            मुंबईदि. 14 :- आद्य समाजसुधारकसमतेचे प्रणेते महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विनम्र अभिवादन केले. 

            वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

            'अनुभवमंटप' मधून लोकशाही प्रणालीचा विचार देणाऱ्या बसवेश्वर यांची शिकवण आजही मार्गदर्शक आहे. जातीअंतासाठी बसवेश्वर यांनी प्रसंगी व्यवस्थेशी संघर्ष केला. श्रम प्रतिष्ठामहिलांचे अधिकार यांचा पुरस्कार केला. जागतिक पातळीवरील अभ्यास- संशोधनातून महात्मा बसवेश्वर यांना सामाजिक समरसतेचे आद्य प्रणेते म्हणून गौरविण्यात आले आहेहे देखील अभिमानास्पद आहेअसे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.