महाडीबीटी पोर्टल योजना : अर्ज एक योजना अनेक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मे २०२१

महाडीबीटी पोर्टल योजना : अर्ज एक योजना अनेक

महाडीबीटी पोर्टल योजना : अर्ज एक योजना अनेक

Ø एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित.

Ø "बियाणे" या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 चंद्रपूर,दि.8 मे : कृषी विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजनाया सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे या प्रणालीद्वारे शेती निगडीत विविध बाबींसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर "शेतकरी योजना" या शीर्षकांतर्गत "बियाणे" या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोया,भात, तूर, मूग, उडीद, मका,  बाजरी इत्यादी पिकांचे अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून दि. 15 मे 2021 पर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज करावे.

असा करा अर्ज:

महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरील "शेतकरी योजना" हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल अथवा संगणकाद्वारे, सामुदायिक सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्राच्या माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. "वैयक्तिक लाभार्थी" म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्याचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्याची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून  योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

अर्ज करतेवेळी  आपल्या जवळच्या सामुहीक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता तसेच कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेलवर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.