माडूरवार सिटीस्कॅनने रहदारी मार्गावर जाळल्या पीपीई किट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मे २०२१

माडूरवार सिटीस्कॅनने रहदारी मार्गावर जाळल्या पीपीई किट
चंद्रपूर/ प्रतिनिधी

कोरोना आजारामुळे बेजार झालेल्या चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या दुःखात कमाईची तिजोरी भरू पाहणाऱ्या डॉक्टरचा आणखी एक प्रताप उघड झाला आहे. कोरोना हा संसर्गजन्य असतानाही खुद्द डॉक्टरकडून रहदारी मार्गावर पीपीई किट जाळण्यात आल्या. हा प्रकार लक्षात येताच कानउघडणी केल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरकडे बोट दाखविले. हा प्रकार डॉ. माडूरवार यांच्याकडून सिटीस्कॅनसमोरच घडला आहे. 

डॉ. अनिल माडूरवार यांचे मूल रोड येथे सिटी स्कॅन सेंटर आहे. कोरोनातील वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावर फेकता येत नाही. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. पीपीई किट उघड्यावर फेकणाऱ्या नर्सिंग होम तसेच रूग्णालयांवर कडक कारवाईची तरतूद आहे. सिटी स्कॅन सेंटरमध्ये अनेक पॉझिटिव्ह रुग्ण तपासणीला येतात. त्यामुळे येथील यंत्रणा पीपीई कीट, हातमोजे, मास्कचा वापर करते. कोरोना काळात शासन काळजी घेण्याचे सांगत असतांना डॉ. अनिल माडूरवार यांचे मूल रोड येथे सिटी स्कॅन सेंटरमधील पीपीई कीट रहिवाश्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशा रहदारीच्या मार्गावर उघड्यावर जाळण्यात आला. हा प्रकार काही जागृत नागरिकांनी बघितला. त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार काय आहे, अशी विचारणा केली. तेव्हा डॉक्टर साहेबानी सांगितले, असे उत्तर दिले. या बाबत डॉ. अनिल माडूरवार यांची विचारणा केली. तेव्हा त्यांनी कर्मचारी नवीन असल्याने हा प्रकार घडला, अशी प्रतिक्रिया दिली . मागील आठवड्यातच याच माडूरवार सिटी स्कॅन सेंटर येथे शासनाने नियमुन दिलेल्या दरानुसार दर आकारात नाही आहे, अशी तक्रार होती. याची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी डॉक्टरला ताकीद दिली. येथे सिटीस्कॅनसाठी ५ हजाराहून अधिक रक्कम घेतली जात आहे. डॉ. अनिल माडूरवार यांनी यांनी आतातरी समजदारीने घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.