कोसमतोंडी ग्रामपंचायत चा प्रताप , उग्र आंदोलनाचा इशारा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०८ मे २०२१

कोसमतोंडी ग्रामपंचायत चा प्रताप , उग्र आंदोलनाचा इशारा

अतिक्रमण हटविण्याच्या आदेशास ग्रामपंचायतीने दाखविली केराची टोपली.

कोसमतोंडी ग्रामपंचायत चा प्रताप , उग्र आंदोलनाचा इशारा.संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.8 मे:-

सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी येथील बाजार चौकातील अतिक्रमण हटविण्या- संबंधात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु वरिष्ठांनी ग्रामपंचायत कोसमतोंडी ला अतिक्रमण हटविण्याचे पत्र दिले त्या पत्राला  केराची टोपली दाखविण्यात आली. 

मागील अनेक वर्षापासून कोसमतोंडी येथे आठवडी बाजार भरत असून परिसरातील अनेक शेतकरी व व्यापारी या बाजारात आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. ग्राम कोसमतोंडी येथील गट क्रमांक 502 ह्या गट क्रमांकाची 0.28 हेक्टर आर ही जागा आठवडी बाजारासाठी मुकर्रर्र करण्यात आली परंतु होणाऱ्या व झालेल्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी आठवडी बाजार भरण्यास अडचण निर्माण होत आहे. सदर जागेवर होणार्‍या अतिक्रमणामुळे अनेक वेळा ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. परंतु काही राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे या प्रश्नांवर चर्चाच करण्यात आली नाही. अतिक्रमणाच्या बाबतीत 18 /3 /2021 ला अर्ज करण्यात आला होता. परंतु ग्रामसेवक गोमासे यांनी त्या अर्जा कडे लक्षच दिले नाही त्यामुळे कोसमतोंडी ग्रामवासी यांनी पुन्हा दिनांक 27 /4/ 2021 ला जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,  खंडविकास अधिकारी, तहसीलदार सडक अर्जुनी यांना निवेदन देण्यात आले होते.            ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनावर गटविकास अधिकारी यांनी दिनांक 3/ 5 /2021 ला ग्रामपंचायत स्तरावरील अतिक्रमणे आणि अडथळे दूर करण्यासाठी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम-1958 चे कलम 53 मध्ये नमूद केल्यानुसार अतिक्रमण काढण्याचे अधिकार हे ग्रामपंचायत पंचायतीला आहेत. असे नमूद करीत सदर प्रकरणे ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार कार्यवाही करण्याचे आदेश ग्रामपंचायतला दिले.     गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या आदेशावर काय कार्यवाही करण्यात आली असे विचारण्यासाठी काही ग्रामस्थ कार्यालयात गेले असता ग्रामसेवक गोमासे यांनी उडवाउडवीचे उत्तर देत आलेल्या ग्रामस्थांना हाकलले या संपूर्ण प्रकरणात ग्रामसेवक गोमासे यांची भूमिका व जनसामान्यांना सोबतचे व्यवहार बरोबर नसल्याने त्यांच्या निलंबनाची मागणी सुद्धा ग्रामस्थांनी केली आहे. बाजार चौकातील अतिक्रमण न हटविल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. 

"अनेक वेळा निवेदन देऊनही अतिक्रमण न हटविल्यास उग्र आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही हेही ग्रामस्थांनी सांगितले.कोसमतोंडी चे सरपंच यांचे घर बाजार चौकातील अतिक्रमणात असल्याने अतिक्रमण काढण्यास अधिकाऱ्यांचा विरोध दिसत असून ग्रामसेवक गोमासे यांची दुहेरी भूमिका आहेत सरपंचाचे घर अतिक्रमण मध्ये आहे तर आम्ही आपले बांधकाम बंद करणार नाही अशी भूमिका अतिक्रमण करणाऱ्या अतिक्रमण धारक यांनी घेतली आहे सरपंचांच्या अतिक्रमणामुळे जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार लावली असून त्यांच्या चौकशी कडे सर्वांचे लक्ष आहे."-गौरेश बावनकर,गावकरी कोसमतोंडी.