खासदार बाळू धानोरकर यांनी केली बल्लारपूर येथिल कोरोना सेंटरची पाहणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ मे २०२१

खासदार बाळू धानोरकर यांनी केली बल्लारपूर येथिल कोरोना सेंटरची पाहणी

पूर्ण क्षमतेने कोविड केअर सेंटर कार्यान्वित करा
चंद्रपूर : मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक प्रभावशाली असून मोठ्या प्रमाणात मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. त्यासोबतच आता तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था उभारण्याची गरज आहे. बल्लारपूर तालुक्यात ५१० बेड्सचे नियोजन असून त्यातील काहीच केंद्र कार्याविन्त झाले आहे. त्यामुळे येत्या १० दिवसात पूर्ण क्षमतेने कोरोना केअर सेंटर कार्यान्वित करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी प्रशासनाला केल्या आहे.
                                 खासदार बाळू धानोरकर यांनी या केंद्राला भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी ढवळे, तहसीलदार राईंचवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मेश्राम, मुख्याधिकारी नगर परिषद सरनाईक, काँग्रेस नेते घनशाम मुलचंदानी, करीमभाई, भास्कर माकोडे, देवेंद्र आर्या, जयफराज बजगोती, डॉ. भसारकर, इस्मानभाई, मो. फारूक यांची उपस्थिती होती.
                 यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी समाजकल्याण विभागाचे मुलीचे व मुलांच्या अस्तिगृहाला भेट दिली. यामध्ये २ जनरेटर, ५ व्हेंटिलेटर,  ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, रुग्णवाहिका ठेवण्याच्या त्यांनी सूचना केल्या.यावेळी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यामध्ये समाजकल्याण विभाग मुलींचे वसतिगृह  येथे ६० बेड कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यासोबतच मुलांचे वसतिगृह येथे १२० बेड्स, बल्लारपूर स्टेडियम परिसरात स्पोर्ट हॉल येथे ४० बेड्स, पॉव्हेलिअम बिल्डींग येथे ४० बेड्स, बॅडमिंटन हॉल येथे ७० बेड्स, कळमना प्रार्थमिक आरोग्य केंद्र तसेच मानोरा आरोग्य केंद्र येथे प्रत्येकी ८० अशी व्यवस्था केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु यातील काहीच सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. वाढत्या कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता संपूर्ण केंद्र  संपूर्ण क्षमतेने १० दिवसात कार्यान्वित करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या.