कोरोनाच्या संकटात आयसीआयसीआय बँकेतर्फे मनपाच्या कोव्हिड रुग्णालयाला मदतीचा हात
१६ मे २०२१
कोरोनाच्या संकटात आयसीआयसीआय बँकेतर्फे मनपाच्या कोव्हिड रुग्णालयाला मदतीचा हात
चंद्रपूरातील रुग्णसेवेसाठी अत्याधुनिक
रुग्णवाहिका मनपाला सुपूर्द
चंद्रपूर, ता. १६ : कोरोनाच्या संकटात चंद्रपूर शहरातील नागरिकांना रुग्णसेवा देण्याच्या दृष्टीने आयसीआयसीआय बँकेने सीएसआर फंडातून चंद्रपूर शहर महानगरपालिकेला रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मदतीचा हात दिलेला आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आसरा कोव्हिड रुग्णालयामध्ये रविवारी (ता. 16) झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आयसीआयसीआय बँकेने रुग्णवाहिका मनपाला सुपूर्द केली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयसीआयसीआय बँकेचे रिजनल हेड विवेक बल्की, सत्तापक्षनेता संदीप आवारी, नगरसेवक संजय कंचर्लावार, श्रीमती मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, आयसीआयसीआय शाखा व्यवस्थापक श्रीकांत ठाकूर, विवेक चौधरी, वैभव माकोडे, आदी उपस्थित होते.
याच आठवड्यात आयसीआयसीआय बँकेने सीएसआर फंडातून चंद्रपूर शहर महानगरपालिकेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट दिली होती. यावेळी रुग्णवाहिकादेखील देत असल्याचे आयसीआयसीआय बँकेचे रिजनल हेड विवेक बल्की यांनी जाहीर केले होते. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे 45 खाटांचे कोव्हिड रुग्णालय साकारण्यात आले आहे. येथे गंभीर रुग्णांना रुग्णालयात हलविण्यासाठी ही रुग्णवाहिका देण्यात आली. याशिवाय कोरोना रुगांना मदत व्हावी, यासाठी आणखी सहकार्य करू, असे आश्वासन आयसीआयसीआय बँकेचे रिजनल हेड विवेक बल्की यांनी दिले. यावेळी त्यांनी चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांना रुग्णवाहिकेची चाबी सुपूर्द केली. या छोटेखानी कार्यक्रमाला नवनियुक्त कोव्हिड रुग्णालयातील आरोग्य चमू आदी उपस्थित होते.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
