जैनमंदिर कोव्हिङ केयर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ मे २०२१

जैनमंदिर कोव्हिङ केयर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले भेट


माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या तर्फे भा. ज. प. चे जेष्ठ कार्यकर्ते निळकंठराव सोनकुसरे गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ जैनमंदिर कोवीड केयर सेंटर ला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले भेट


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी):
मागील काही दिवसातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व ऑक्सिजन ची कमतरता लक्षात घेता कोरोना मुळे दगावलेले भा.ज. प. चे जेष्ठ कार्यकर्ते निळकंठराव सोनकुसरे गुरुजी रा. चंदनखेडा यांच्या परिवाराच्या उपस्तितीत माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी आज दिनांक २२ मे २०२१ ला जैनमंदिर कोवीड केयर सेंटर ला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले.
भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालया अंतर्गत सूरू असलेल्या जैनमंदिर कोवीड केयर सेंटर येथे शहरातील व तालुक्यातील हजारो रुग्णांचे उपचार झाले. मागील महिन्यातील कोरोना प्रादूरभावाची तीव्रता व रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजन चा तुटवडा या दोन्ही गोष्टी लक्षात घेता माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहिर यांनी वेळोवेळी या सेंटर ला लागेल ते साहित्य जसे ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन फ्लो मीटर, ग्लोवज, मास्क व इतरही साहित्य पुरविले आहे.
     कोरोना मुळे दगावलेल्या भा. ज. प चे जेष्ठ कार्यकर्ते श्री निळकंठराव सोनकुसरे गुरुजी यांनी जीवनभर  केलेल्या समाजकार्याची दखल घेत  त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज दिनांक २२ मे २०२१ ला त्यांच्या पत्नी नंदाताई सोनकुसरे त्यांची मुलगी पल्लवी केदार व चंदनखेडा येथील भा. ज. प  कार्यकर्ते डेविस बागेसार व भद्रावती येथील पदाधिकारी गोपाल गोस्वाडे, किशोर गोवरदीपे, प्रवीण सातपुते, निशांत देवगडे, संजय वासेकर, विजय वानखेडे, गोविंदा बिंजवे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोवीड केयर सेंटर च्या इनचार्ज भाग्यश्री उमाटे, डॉ.रुबी तावडे व अधिपरिचारिका देविका यांना सुपुर्द केले. 
             या प्रसंगी बोलतांना श्री अहिर यांनी या कोवीड सेंटर च्या संपूर्ण स्टाफ चे भरभरून कौतुक केले व या पुढेही अशीच मदत करत राहण्याचे आश्वासन श्री अहिर यांनी दिले.