गडचिरोलीतील दारूबंदी उठविण्यासाठी राजकीय हालचालींना वेग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२९ मे २०२१

गडचिरोलीतील दारूबंदी उठविण्यासाठी राजकीय हालचालींना वेग



गडचिरोली/ प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी तब्बल ६ वर्षांनी उठविल्यानंतर आता लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर येथील दारूबंदी उठविण्याची घोषणा होताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला. त्याच पार्श्वभिमूवर गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी जनतेच्या भावना लक्षात घेऊन राज्याचे आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी दारूबंदी उठवू अशी माहिती दिली. गडचिरोली दौऱ्यावर आले असता त्यांनी संवाद साधला.

'दारूबंदी करताना जे उद्देश ठेवण्यात आले होते, ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. तरीसुध्दा जिल्ह्यातील काही तथाकथित समाजसेवक स्वार्थापोटी दारूबंदीचे समर्थन करतात. मात्र, त्यांच्या मागे येथील नागरिकांचे समर्थन नाही', असं ते म्हणाले. समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. सोबतच गडचिरोलीतील लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनता दारूबंदीच्या विरोधात असून पालकमंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेऊन समीक्षा समिती स्थापन करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

चंद्रपूरची दारूबंदी उठल्यानंतर विदर्भात मद्य प्रेमींच्या मुखातून एक आवाज घुमू लागला.चंद्रपुर तो झाकी है वर्धा गडचिरोली बाकी है असं म्हणतात विजय वडेट्टीवार यांनी जरी दारू बंदी उठवण्याचा वीळा घेतला असेल तरी मात्र विदर्भातील आणखी दोन जिल्हे हे दारूबंदीच्या यादी गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. चंद्रपूरची सत्ता हस्तगत करताच 'दारूबंदी नही चलेगी' अशी घोषणा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

चंद्रपूरच्या शेजारी वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यात देखील दारूबंदी कायम आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील 28 वर्षांपासून दारूबंदी लागू आहे. असे असलं तरी मात्र चंद्रपूरची दारू बंदी उठविल्यानंतर आणि वडेट्टीवार यांना मिळालेल्या श्रेयानंतर आता गडचिरोलीतील दारूबंदी उठवावी असा स्वर आता गडचिरोलीत बघायला मिळत आहे.चंद्रपूरात दारूबंदी लागू झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी ती उठू शकते.तर गडचिरोली का नाही होऊ शकत? असा सवाल गडचिरोलीकर नागरिक विचारत आहेत.