सलून व्यवसायाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२७ मे २०२१

सलून व्यवसायाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करा



राष्ट्रीय जनसेवा पक्षाची मागणी
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी):
नाभीक समाजाच्या सलून व्यवसायाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा अशी मागणी राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे जिल्हा अध्यक्ष किशोर हनुमंते यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदना व्दारे केली आहे .

राज्यातील नाभिक समाज आर्थिक दृष्ट्या अतिशय मागासलेला आहे उत्पन्न आणि इतर कोणतेही साधन नसल्याने संचार बंदी दरम्यान नाभिक समाजाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे .आर्थिक अडचणीत कंटाळून आजवर सत्तावीस नाभिक बांधवांनी आत्महत्या केली आहे. सरकारने मात्र याची अद्यापही कसलीही दखल घेतली नाही.
 राज्यातील तमाम सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिक उत्पन्नच नसल्याकारणाने आज उपासमारीला सामोर जात आहे घर भाडे ,दुकान भाडे, विविध बँकांचे कर्ज, कौटुंबिक खर्च आणि वैद्यकीय खर्च यामुळे त्रस्त झाले आहेत .शासनाला वारंवार विनंती करूनही अद्यापही कसली मदत मिळाली नाही.
 सलून व्यवसायधारकांनी आजवर शासनाच्या सर्वच नियमाचे काटेकोर पालन केले आहे आजवर आमच्या व्यवसायातून कोरोना संसर्ग बाबत एकही घटना घडलेली नाही व्यवसाय बंद असल्यामुळे विविध ठिकाणी ग्राहकांची गैरसोय झाल्याने सेवा देण्यात जबरदस्ती केली जात आहे. म्हणूनच वरील सर्व बाबीचा गांभीर्याने विचार करून आमच्या सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन व्यवसाय सुरू करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे राष्टीय जनसेवा पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर हनुमंते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.