डुग्गीपार पोलीसांची मोहफुलाच्या हातभट्टीवर धाड ६४५१० रूपयांचे मुद्देमाल जप्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ मे २०२१

डुग्गीपार पोलीसांची मोहफुलाच्या हातभट्टीवर धाड ६४५१० रूपयांचे मुद्देमाल जप्त

डुग्गीपार पोलीसांची मोहफुलाच्या हातभट्टीवर धाड  ६४५१० रूपयांचे मुद्देमाल जप्त

संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.११ मे:-


गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत फुटाळा(सौंदड) येथील चुलबंद नदी किना-यावर संतोष राजीराम बनकर रा. सौंदड हातभट्टी लावून दारू काढतो, अशा खबरीवर ११मे २०२१ रोजी ठाणेदार सचिन वांगडे व पोलिस ताफ्यासह सदर परिसराची पाहणी करून धाड टाकली असता, त्याठिकाणी दारू गाळण्याचे दोन लोखंडी ड्रम,१२ प्लास्टीक पाॅलीथीनमध्ये प्रत्येकी ६० किलोग्रम प्रमाणे सडवा मोहा पास एकुण ७२० किलोग्रम किंमत ८० रुपये प्रमाणे ५९०४० रूपये व ४ लीटर हातभट्टी मोहफुलाची दारू ४००रूपये व इतर दारू गाळण्याचे  साहित्य असा एकूण ६४५१० रूपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले असून आरोपी संतोष राजीराम बनकर, सचिन एकनाथ मांडारकर, मुकेश आसाराम चाचेरे या सर्व राहणार सौंदड यांचे विरूद्ध दारूबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोलिस हवालदार रविशंकर चौधरी करीत आहेत.सदर कार्यवाही विश्व पानसरे पोलीस अधीक्षक गोंदिया, जालंधर नालकुल उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सचिन वांगडे, पोलीस हवालदार रविशंकर चौधरी, पोलीस नाईक उत्तम दहीवले, अनिल पटीये , चालक पो.ना. राहुल वाटोरे पोलीस स्टेशन डुग्गीपार यांनी केली आहे.