न्हावी समाज बांधवांना सॅनिटायझरचे वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ मे २०२१

न्हावी समाज बांधवांना सॅनिटायझरचे वाटप

 न्हावी समाज बांधवांना सॅनिटायझरचे वाटप

गोंदिया येथील प्रेसफोटोग्राफर टोपराव पुंडकर यांचा स्तुत्य उपक्रमसंजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.17 मे:-

 काल दिनांक 16 मे रोज रविवारला श्री संत सेनाजी महाराज देवस्थान, खांबी येथे न्हावी समाजातील गरजू सलून कारागीर बंधूंना सॅनिटायझर चे वाटप केले. 

  लॉकडाऊन कारणाने सलून दुकाने बंद असल्यामुळे बरेच सलून कारागीर बंधू, ग्राहकांच्या घरी जाऊन सलून सेवा देत आहेत. अश्यावेळी स्वतःची व परिवाराची काळजी म्हणून सॅनिटायझर चा वापर नितांत गरजेचे आहे. परंतु  या हलाकीच्या परिस्थितीमुळे हाथावर पोट व पैशाची चणचण त्यामुळे अतिरिक्त खर्च झेपणे अवघड झाले आहे. समाजातील सलून बंधूंची हिच गरज लक्ष्यात घेता समजाबद्दल आपुलकी व अश्या नाजूक परिस्थितीत आपणही समाजाचे ऋण फेडावे  यावे या निःस्वार्थ भावनेने  टोपरावजी पुंडकर प्रेस फोटोग्राफर गोंदिया यांनी स्वेच्छेने समाजात कोरोना व्हायरस संसर्गाबाबत जनजागृती व्हावी. या उद्देशाने 25 लिटर सॅनिटायझर  उपलब्ध करून दिले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 

या प्रसंगी माणिक मेश्राम व इंजिनियर मायकल पुंडकर अर्जुनी-मोर यांच्या शुभहस्ते समाजातील गरजू सलून कामगार बंधूंना सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. यावेळेस प्रत्येक लाभार्थ्यांकडून   मी मी स्वतः सॅनि टायझर चा वापर करिन,माझे केसकर्तनाचे साहित्य व स्वतः चे हात स्वच्छ ठेवणार,तसेच माझ्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना या बद्दल प्रेरित करणार.शासकीय लॉक डाऊन च्या नियमांचे पालन करून,स्वच्छते विषयी जागृती करेन. अशी प्रतिज्ञा समाज बांधवांकडून यावेळी हे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले.तसेच विनंती सूचना करण्यात आली की,अर्जुनी मोरगावपरिसरातील सर्व गरजू सलून कारागीर बंधू यांनी आप आपल्या सोयीनुसार श्री संत सेनाजी महाराज देवस्थान खांबी  येथे प्रतिज्ञापत्र लिहून देऊन अर्धा लिटर सॅनिटायझर  निशुल्क प्राप्त करावे. तसेच सॅनिटायझर चा वापर करून आपली व आपल्या ग्राहक बंधू यांची काळजी घ्यावी.तालुक्यातील समाज बांधवांनी अशोकजी लांजेवार व रंगनाथ उरकुडे खांबी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.