फडणवीसांनी दिले लसीकरणासाठी मनपाला एक कोटी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०६ मे २०२१

फडणवीसांनी दिले लसीकरणासाठी मनपाला एक कोटी

 फडणवीसांनी दिले लसीकरणासाठी मनपाला एक कोटी नागपूर, ता. ६ : राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेता व माजी मुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस यांनी नागपूरच्या नागरिकांचे सुरळीत लसीकरण करण्यासाठी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या आवाहनावर आपल्या आमदार निधीतून मनपाला रुपये १ कोटीचा निधी चे पत्र महापौरांना दिले. 

यावेळी आमदार श्री. प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते श्री. अविनाश ठाकरे, माजी महापौर श्री. संदीप जोशी, स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर, माजी सत्तापक्ष नेता श्री. संदीप जाधव, ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुनील अग्रवाल उपस्थित होते.