सेवा श्री. साई पतसंस्थेचे अध्यक्ष रविंद्र सातपुते यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०६ मे २०२१

सेवा श्री. साई पतसंस्थेचे अध्यक्ष रविंद्र सातपुते यांचे निधन

 सेवा श्री. साई पतसंस्थेचे अध्यक्ष रविंद्र सातपुते यांचे निधन


नागपूर, ६ मे - सेवा श्री साई सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, नागपूर  शहर काँग्रेसच्या ब्लॉक क्रमांक १५ चे उपाध्यक्ष व विनोबा भावे नगरातील रहिवासी रविंद्र सातपुते यांचे आज निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते.


उत्तर नागपुरातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये रविंद्र सातपुते यांचा समावेश होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पतसंस्थांच्या माध्यमातून समाजातील वंचित व उपेक्षित घटकांना आर्थिकदृष्ट्या त्यांनी सबळ केले. रविंद्र सातपुते सेवा श्री साईं सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष होते. यासोबतच ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पतसंस्थेचे संचालक, नागपूर जिल्हा पत संस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष होते. 

उत्तर नागपुरातील  नागपूर शहर काँग्रेस कमेटी ब्लॉक क्र. 15 चे उपाध्यक्ष होते.  तसेच विशेष कार्यकारी अधिकारी सुद्धा होते. त्याच्या पश्चात पत्नी चंदा, मुलगा वत्सल, मुलगी सृष्टी व आई आहे. 


पालकमंत्र्यांची शोक संवेदना

रविंद्र सातपुते यांच्या निधनाने व्यक्तीगत हानी झाल्याची शोक संवेदना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाने एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे. गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून रविंद्रचे काम मी जवळून पाहत आलो आहे. घरची परिस्थिती बेताची होती, परंतु स्वप्न मात्र मोठे होते. पतसंस्थांच्या माध्यमातून रविंद्रने केवळ माणसे जोडली नाही तर या माणसांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचे व त्यांच्या अडचणीत धावून जाण्याचा त्याचा स्वभाव होता. अगदी शून्यातून रविंद्रने पतसंस्थांचे जाळे विणले, असे डॉ. राऊत यांनी शोक संदेशात म्हटले आहे.