सडकअर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील सी.आर.पी.एफ. जवान प्रमोद कापगते शहीद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२७ मे २०२१

सडकअर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील सी.आर.पी.एफ. जवान प्रमोद कापगते शहीद

सडकअर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील सी.आर.पी.एफ. जवान प्रमोद कापगते शहीद

परसोडी गावावर शोककळा

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.27 मे:--
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत जवान प्रमोद विनायक कापगते यांचे आज दि.२५ मे ला नागालँड येथे कर्तव्यावर असतांना सकाळी ५ वाजे चकमकीत गोळी लागून शहीद झाले.त्यांचे पार्थिव २७/५/२०२१ त्यांचे मुळ जन्मगावी परसोडी येथे सकाळी ८ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.तालुक्यातील परसोडी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाचे वीर जवान प्रमोद विनायक कापगते यांना देशसेवा करत असताना नागालँड सिमेवर चकमकीत गोळी लागून वीरमरण आले.भारतमातेची सेवा करणारा सुपुत्र सडक अर्जुनी तालुक्याने गमावला आहे.वीर जवान शहीद प्रमोद विनायक कापगते वय ४० वर्षे यांचे जन्म १४/८/१९८० ला झाले.त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा परसोडी व नंतर पुढील शिक्षण राजीव गांधी विद्यालय सडक अर्जुनी येथे बी.ए. प्रथम वर्ष असतांनी केंद्रीय राखीव पोलीस दलात सन २००१मध्ये सैनिक म्हणून भरती झाले. करारानुसार त्यांची १५-२०  दिवसात सेवा समाप्त होणार होती.देशाची सेवा २० वर्ष केली.त्यांचे मृत्यू पश्चात पत्नी वंदना प्रमोद कापगते वय ३५ वर्ष, मुलगा कुणाल वय १२ वर्ष, वेद वय १० वर्ष आणि भाऊ राजेश कापगते  आणि वडील विनायक कापगते   भाजपा चे  माजी तालुका अध्यक्ष यांचे सुपुत्र होते. शहीद वीर जवान यांचे  दि. २७ मे ला शव मुळजन्मगावी परसोडी येथे सकाळी ८ वाजेपर्यंत पोहचणार असल्याचे समजते. आणि नंतर त्याचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.देशाची सेवा करत असताना शहीद जवानांला नागालँड सिमेवर चकमकीत  वीरमरण मरण आले. भारतमातेची सेवा करणारा सुपुत्र सडक अर्जुनी तालुक्याने गमावला असल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.