चंद्रपूर मनपाची मोठी कारवाई; उपायुक्त उतरले रस्त्यावर - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

मंगळवार, मे ११, २०२१

चंद्रपूर मनपाची मोठी कारवाई; उपायुक्त उतरले रस्त्यावर

शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांविरुद्ध मनपाची कारवाई

उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे यांनी केली कारवाई;नियमभंग केल्याप्रकरणी 56 हजारांचा दंड वसूल

चंद्रपूर, ता. ११ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा दुपारी ११ नंतर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा शहरातील काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी (ता. ११) मनपाचे उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे यांनी शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. नियमभंग केल्याप्रकरणी 56 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. 

मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे यांच्यासह झोन क्रमांक २ चे सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, मुख्य स्वच्छता निरीक्षक भुपेशगोठे, श्री. पंचभुते व व झोन २ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईत हसन अली अकबर अली यांचे बाधकाम सुरु असताना 10 वर कामगार एका ठिकाणी आढळून आल्याने 10000/- रु. दंड करण्यात आला. याशिवाय जीबी सन्स यांना रु 25000/, दीपक एजन्सी 5000/- रु, अग्रवाल एजन्सीकडून 5000/- रु व गणपती ट्रेडिंगकडून  1000/- रू असे एकूण 46000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 


मंगळवारी (ता. ११) मनपाने चंद्रपूर शहरातील झोन क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या ५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १० हजार रूपयाचा दंड वसूल केला.  

मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. एकच्या सहाय्यक आयुक्त शीतल वाकडे, क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, लिपिक फारुख अहेमद, विलास नांदणे, तसेच अतिक्रमण पथक यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईत शौकत अली, एरिस्टो सेल्स कारपोरेशन, अमोल ट्रेडर्स, रविंद्र फर्निचर, जुनेद खान यांच्याविरुद्ध  दंडात्मक कारवाई करुन एकूण दंड १०,०००/-  वसूल करण्यात आले. यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास प्रसंगी प्रतिष्ठान सील करण्यात येईल, अशी ताकीद मनपाकडून देण्यात आली.