आरोग्य विभाग व ग्रामपंचायत च्या पुढाकाराने गोवरी गाव कोरोना मुक्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०३ मे २०२१

आरोग्य विभाग व ग्रामपंचायत च्या पुढाकाराने गोवरी गाव कोरोना मुक्तराजुरा- मागील महिनाभरापूर्वी गोवरी गावात तापाची साथ असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. तापाच्या साथीत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला .त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाने ठोस पावले उचलली व गावात आरोग्य शिबिर लावले. सरपंच आशा उरकुडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विपिन कुमार ओडेला यांनी गावात ऑंटीजीन तपासणी शिबिर  लावले. यात शंभरपेक्षा अधिक नागरिक कोरोना बाधित निघाल्यामुळे नागरिकांना केंद्रावर उपचार देण्यात आले. त्यामुळे सर्व नागरिक उपचार घेऊन गावी सुखरूप परतले आहेत. सर्वांच्या सहकार्याने गावकऱ्यांनी कोरोनावर मात केलेली आहे.आता मागील चौदा दिवसापासून बंदिस्त असलेले गाव आता खुले झालेले आहे . 

आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोना साथीचे नियंत्रण करता आले.

यावर नियंत्रण मिळविण्यासाठी गावात तब्बल चार दिवस आरोग्य शिबीर लावण्यात आलेले होते यामध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करून आरोग्य तपासणी बाबत लोकांना मार्गदर्शन करण्यात आले. लोकांच्या मनातील भीती नाहीशी करून योग्य उपचार घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन केले. चार दिवसांमध्ये जवळपास 350 नागरिकांची आरोग्य तपासणी केली. कोरोणा बाधित रुग्णांना उपचारासाठी कोवीड सेंटर येथे दाखल करण्यात आले. गावात नशंभरपेक्षा अधिक रुग्ण कोविड बाधित रुग्ण निघाल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशाही परिस्थितीत सरपंच आशा उरकुडे, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बबन उरकुडे, ग्रामपंचायत सदस्य चेतन बोभाटे, सिद्धार्थ कासवटे, सबुद्ध पंचशील मंडळाचे अध्यक्ष दिनेश घागरगुंडे याने संकट काळात नागरिकांना धीर दिला. नागरिकांना आरोग्य तपासणीसाठी सहकार्य केले व वैद्यकीय उपचार घेण्यासाठी प्रोत्साहित केले. गावातील आजारी कुटुंबांना भेटी देऊन त्यांची आरोग्य तपासणी केली. कोबीड केंद्रावर उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना फळांचे वाटप करून धीर दिला. गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्यानंतर  नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. यामुळे नागरिकांनी संकट काळात न घाबरता सामना केला. चौदा दिवसानंतर गावातील प्रवेश बंदी उठविण्यात आलेली आहे . कोबीड केंद्रावर उपचारासाठी गेलेले सर्व रुग्ण सुखरूप गावी परत आलेले आहेत. त्यामुळे गावातील सरपंच अशा उरकुडे यांनी समाधान व्यक्त केले. आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी .काही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय उपचार घ्यावा . यापुढेही कोरोना मुक्त गाव राखण्यासाठी नागरिकाने प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच आशा उरकुडे यांनी केले आहे.  नागरिकांच्या आरोग्य तपासणी साठी गौवरी उपकेंद्रातील आरोग्य केंद्र कर्मचारी सुरेश कुंभारे,आरोग्यसेविका गाडगे, अशा झाडे , हेमलता इटणकर यांनी सहकार्य केले.