दारूबंदी उठविली; झळकले निषेधाचे फलक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

३१ मे २०२१

दारूबंदी उठविली; झळकले निषेधाचे फलकचंद्रपूरमध्ये महिलांनी मोठ्या लढ्यानंतर दारूबंदी करण्यात यश मिळविले होते. परंतु राज्य सरकारने चंद्रपूर येथील दारू बंदी उठविल्याचे पडसाद धुळ्यात देखील उमटताना दिसून येत आहेत. राज्यातील चंद्रपूर येथे असलेली दारूबंदी राज्य सरकारने उठवल्यानंतर राज्य सरकारचा निषेध करीत धुळ्यातील संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चा तर्फे राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या निषेधाचे फलक झळकवत राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली आहे.