Top News

खासदार बाळू धानोरकर निधन : पार्थिव थेट वरोरा येथे दाखल | MP Balu Dhanorkar

आज वरोरा येथे अंत्यदर्शन उद्या अंत्यसंस्कार समर्पित सेना कार्यकर्ता ते काँग्रेस खासदार केला प्रवास Congress’s only Lok Sabha MP from Maharas...

ads

शनिवार, मे १५, २०२१

'कोरोना'साठी चंद्रपूरला किती निधी?




नागपूर हायकोर्टाची विचारणा

माजी खासदार नरेश पुगलिया यांची याचिका

नागपूर : चंद्रपूर शहर व जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी अद्याप किती निधी खासगी सामाजिक दायित्व(सीएसआर)अंतर्गत प्राप्त झालेला आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. यावर 19 मे पर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमण वाढत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा दावा करून जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि बेडसाठी रुग्णांची कशाप्रकारे धावपळ होत आहे, यावर याचिकेत मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. खासगी सामाजिक दायित्व चंद्रपूरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी दोन कोटींचा निधी देण्याचे वेकोलीने स्पष्ट केले होते. तर, किती कंपन्यानी निधी दिला किंवा नाही? यावर सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ही याचिका माजी खासदार नरेश पुगलिया व इतरांनी दाखल केली आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.