वंचित बहुजन युवा आघाडी व भीमशक्ती युवा ग्रुप विसापूर तर्फे रक्तदान शिबीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ मे २०२१

वंचित बहुजन युवा आघाडी व भीमशक्ती युवा ग्रुप विसापूर तर्फे रक्तदान शिबीर

वंचित बहुजन युवा आघाडी व भीमशक्ती युवा ग्रुप विसापूर तर्फे रक्तदान शिबीर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा  फुले, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आणि बहुजनाचे हृदयसम्राट वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दिनांक 10 मे 2021 रोजी विसापूर येते रक्तदान शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडी चे विदर्भ संयोजक मा.राजुभाऊ झोडे, मा. संपत कोरडे आणि शिबिराचे आयोजन स्वप्नील सोनटक्के,सिद्धांत पुणेकर, सचिन पुणेकर, आकाश पाझारे, स्वयमदीप पारेकर, गुंजन वानखडे, सचिन कौरासे, प्रथम दुपारे, सिध्दार्थ चूनारकर, प्रणील गावंडे,प्रतिक वणकर,भारत दुबे, प्रणित चालखुरे, फारूख शेख व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथील रक्तकेंद्र विभागाचे पंकज पवार, अमोल जिद्देवार, रोशन भोयर, लक्ष्मण नगराळे, रूपेश घुमे यांचे सहकार्य लाभले. आणि सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.