तथागत बुद्ध जयंती निम्मित रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ मे २०२१

तथागत बुद्ध जयंती निम्मित रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम


डॉ. बी. आर. आंबेडकर युथ क्लबचा उपक्रम

शिरीष उगे(भद्रावती प्रतिनिधी) : महाकारुणिक सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जयंती निम्मित दिनांक २६ मे २०२१ ला ऐतिहासिक विज्जासन बुद्धलेणी परिसरात रक्तदान तथा वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन.
     कोरोना महामारी च्या संकटा मुळे इतर उत्सवा प्रमाणेच बुद्ध जयंती सुद्धा अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. मागील कित्तेक वर्षांपासून ऐतिहासिक विज्जासन बुद्ध लेणी परिसरात स्थानिक डॉ बी आर आंबेडकर युथ क्लब तर्फे बुद्ध जयंती निमित्त बुद्ध पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतो . परंतु मागील वर्षी पासून कोरोना चे सावट असल्या मुळे कार्यक्रम अगदी सध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. लोकांची गर्दी करण्यास मनाई असल्या मुळे कार्यक्रम फेसबुक वर लाईव्ह करण्यात येत आहे व त्याच वेडेस उपासकांनी आपल्या घरीच राहून बुद्धवंदना ग्रहण करायचे आहे. 
           तथागत बुद्धाच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे व उपासकानी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे सोबतच या ऐतिहासिक कार्यक्रमाची आठवण म्हणून प्रत्येकाने एक वृक्ष लावायचे आहे. 
             या जयंती प्रसंगी आरोग्य सोबतच निसर्गाचे समतोल राखण्यात यावे या करिता रक्तदाना सोबतच वृक्षारोपण करण्यात येत आहे. हा  संपूर्ण कार्यक्रम फेसबुक पेज द्वारे लोकांपर्यंत पोहचवण्यात येईल तरी संपूर्ण जनतेनी या संधी चा लाभ घावा अशे आवाहन डॉ. बी. आर. आंबेडकर युथ क्लब तर्फे करण्यात आले आहे.