तथागत बुद्ध जयंतीनिमित्त उपसकांनी केले रक्तदान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२७ मे २०२१

तथागत बुद्ध जयंतीनिमित्त उपसकांनी केले रक्तदान
वृक्षारोपण करून कार्यक्रम पार पडला

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) :
महाकारुणिक सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जयंती निम्मित दिनांक २६ मे २०२१ ला ऐतिहासिक विज्जासन बुद्धलेणी परिसरात रक्तदान तथा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला .
     कोरोना महामारी च्या संकटा मुळे इतर उत्सवा प्रमाणेच बुद्ध जयंती सुद्धा अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात  आली . मागील कित्तेक वर्षांपासून ऐतिहासिक विज्जासन बुद्ध लेणी परिसरात स्थानिक डॉ बी आर आंबेडकर युथ क्लब तर्फे बुद्ध जयंती निमित्त बुद्ध पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतो . परंतु मागील वर्षी पासून कोरोना चे सावट असल्या मुळे कार्यक्रम अगदी सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला . लोकांची गर्दी करण्यास मनाई असल्या मुळे कार्यक्रम फेसबुक वर लाईव्ह करण्यात आला  उपासकांनी आप - आपल्या घरीच राहून भदंत  धम्मानंद यांच्या मंगल वाणीतून  बुद्धवंदना व धम्म देसना ग्रहण केली  . 
           तथागत बुद्धाच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यात  उपासकानी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद म्हणून 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी शाशकीय रक्तपेढी तर्फे डॉ. योगेश गेडाम, संजय गावित समाज सेवा अधिक्षक, अमोल जिद्देवार प्रयोगशाळा तंत्रज्ञ, राम वाघोली नर्सिंग स्टाफ, साधना नाईक नर्सिंग स्टाफ, जे. ताडे  प्रयोगशाळा तंत्रज्ञ व रुपेश घुमे वाहनचालक  उपस्तित होते. 
        या जयंती प्रसंगी आरोग्या  सोबतच निसर्गाचे समतोल राखण्यात यावे या करिता रक्तदाना सोबतच वृक्षारोपण करण्यात आले . हा  संपूर्ण कार्यक्रम डॉ बी. आर. आंबेडकर युथ क्लब व बहुजन संघटक या दोन फेसबुक पेज द्वारे लोकांपर्यंत पोहचवीण्यात आला.हजारो अनुयायांनी फेसबुक वर प्रसारित या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या जयंतीदिनी घरीच राहून जयंती साजरी केली त्यांचे, ज्यांनी  रक्तदान केले त्यांचे, शासकीय रक्तपेढी चंद्रपूर च्या संपूर्ण टीम चे व ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सहकार्य केले त्या सर्वांचे  डॉ. बी. आर. आंबेडकर युथ क्लब तर्फे आभार व्यक्त करण्यात आले आहे.