कोल्हापूरकरांना स्फुर्ती देणारा छ. शिवाजी महाराज पुतळा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१३ मे २०२१

कोल्हापूरकरांना स्फुर्ती देणारा छ. शिवाजी महाराज पुतळा

   कोल्हापूरकरांना स्फुर्ती  देणारा छ. शिवाजी महाराज पुतळा 


फेसबुक लिंक http://bit.ly/2RQcgI8
महानगरपालिकेकडुन श्री अंबाबाई मंदिराकडे जाताना लागणारा चौक,या चौकातच पुर्वी गव्हर्नर विल्सन याचा पुतळा होता.हा पुतळा क्रांतिकारकांच्या नजरेत खुपत होता. पण ब्रिटिश राजवट असल्यामुळे काहीच करता येत नव्हते. १९४२ साली देशभर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली चलेजाव चळवळ सुरू झाली. कोल्हापूर संस्थान असूनही इथे या चळवळीने जोर धरला.कोल्हापूरातील  क्रांतिकारकांनी विल्सन चा पुतळा विद्रूप करण्याचा निर्णय घेतला त्याची जबाबदारी भागीरथीबाई तांबट आणि जयादेवी हजारे यांनी उचलली.१० ऑक्टोम्बर १९४२ ला भर दुपारी डांबराची लोटकी त्यांनी विल्सनच्या पुतळ्यावर फेकून तो पुतळा विद्रूप केला. पुतळा विद्रुप करून ब्रिटिश सत्तेविरोधातला असंतोषाच जणू या दोन रणरागिनींनी व्यक्त केला होता. या दोघींना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर खटला भरला त्यांना १६ महिने सक्तमजुरीची शिक्षाही झाली. त्यावेळी भगिरथीबाई तांबट या गरोदर होत्या त्या बिंदू चौक कारागृहात शिक्षा भोगत असतानाच प्रसूत झाल्या.,पुतळयाची विंटबंना झाल्याने याची दखल दिल्लीला घेतली गेली.व तात्पुरता उपाय म्हणुन पुतळा पांढरे कापड टाकुन झाकुन घातला.
स्वातंत्र्य सैनिकांना तो पुतळाच तिथून हटवायचा होता.त्यानंतर माजी खासदार शंकरराव माने यांच्या नेतृत्वाखाली पुतळा पुन्हा फोडण्याचे व कायमचा हटवण्याचे नियोजन झाले. १३ सप्टेंबर १९४३ रोजी पहाटे चार वाजता माजी आमदार काका देसाई, शंकरराव माने, शामराव लहू पाटील यांनी हातात खराटा बादली घेऊन पुतळा स्वच्छ करण्यासाठी जात असल्याचे व नगरपालिका कर्मचारी असल्याचे भासवत ते पुतळ्याजवळ आले. देसाई रिव्हॉल्वर घेऊन रस्त्यावर थांबले. वडणगेचे नारायण घोरपडे आणि त्यांचा एक सहकारी पोलीस वेशात माळकर तिकटी येथे पहारा देत उभे होते. शामराव पाटील यांनी शिडीवरून पुतळ्याजवळ चढून विल्सनच्या पुतळ्यावर हातोड्याने घणाघात करत करून डोके , कान , नाक , चेहरा छिन्नविच्छिन्न करून  हात तोडून पुतळा पूर्णपणे विद्रूप केला. काका देसाई , शंकरराव माने , शामराव लहू पाटील, नारायणराव घोरपडे, नारायणराव जगताप, पांडुरंग जगताप, महादेव भाऊ घाटगे,  पांडुरंग पोवार, आबु जाधव, अहमद शाबाजी मुल्ला,व्यंकटेश उर्फ बाबुराव देशपांडे, डॉ माधवराव कुलकर्णी, वसंत बळवंत तावडे, पै.माधवराव घाटगे, कुंडल देसाई, यांनी सर्वांनी ही मोहीम फत्ते केली.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट, काम पूर्ण झाले असे समजताच सर्वजण तिथून निघून गेले आणि बरेच दिवस भूमिगत राहिले.इकडे पुतळा पूर्णपणे विद्रूप झालेने प्रशासनाने तो हलवला.पुतळयाची जागा रिकामी राहिली.यावेळी प्रखर शिवभक्त चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी या ठिकाणी स्वखर्चाने छ शिवाजी महाराज यांचा पुतळा ऊभारणी करण्यासाठी शासनास प्रस्ताव दिला.आता या ठिकाणी इंग्रजाचा परत पुतळा बसविण्याचे धाडस होत नव्हते,कारण या प्रकारची पुनरावृत्ती होईल ही भिती होती.म्हणुन त्यावेळचे इंग्रज अधिकारी  कर्नल हॅरिसन यांनी भालजी पेंढारकर यांना परवानगी दिली.
पुतळा करण्याचे काम चित्रमहर्षी बाबुराव पेंटर यांनी स्विकारून केवळ १८ दिवसात पुतळा करून दिला.

कोल्हापूरकरांना स्फुर्ती  देणारा छ. शिवाजी महाराज पुतळा

म्यानातून तलवार काढून युद्धासाठी सज्ज असलेला तलवार उचलून उंचावणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा देखणा पुतळा साकारण्यासाठी बाबुराव पेंटर यांना त्यांचा मुलगा रवींद्र मेस्त्री यांची देखील खूप मोलाची मदत झाली. मदनमोहन लोहिया यांनी शुगर मिल मधून कास्टिंग करण्यासाठी सहकार्य केले.व १३ मे १९४५ या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता  पंतप्रधान माधवराव बागवे यांच्या हस्ते  क्षात्र जगद्गुरु महाराज, शेठ माणिकलाल चुनीलाल व महसूलमंत्री भास्करराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत  हा सोहळा झाला.  यावेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष व्ही. टी पाटील सर, कलामहर्षी बाबुराव पेंटर, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, श्रीमंत बाबाराजे खर्डेकर, माधवराव बागल, जे. पी. नाईक आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते. बालवीर यांचा बँड, पोलीस व इतर लवाजमा कार्यक्रम स्थळी होता.स्वराज्याचा भगवा ध्वज फडकावून कार्यक्रम सुरू झाला. स्मारकाचे उद्घाटन होतात उपस्थित हजारो लोकांनी फुलांची उधळण करीत छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत पेढे व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.कोल्हापुरानी आनंदाचा हा दिवस घरोघरी गोडधोड करून साजरा केला.
आज कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे तमाम कोल्हापूर वासियांचे अखंड स्फूर्तिस्थान व ऊर्जास्त्रोत आहे.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
फोटो-सुशोभीकरानंतरचा पुतळा 


======================================
Kolhapurkar is inspiring. Statue of Shivaji Maharaj


The square on the way to Shri Ambabai Mandir from the Municipal Corporation was the statue of former Governor Wilson in this square. This statue was very much in the eyes of the revolutionaries. But since it was British rule, nothing could be done. In 1942, the Chalejav movement was started all over the country under the leadership of Mahatma Gandhi. Despite being a Kolhapur state, the movement gained momentum here. The revolutionaries in Kolhapur decided to deface the statue of Wilson. Bhagirathibai Tambat and Jayadevi Hazare took responsibility for it. It was as if these two warriors had expressed their dissatisfaction with the British rule by defacing the statue. The two were arrested by the police and a case was registered against them. They were also sentenced to 16 months hard labor. At that time, Bhagirathibai Tambat, who was pregnant, gave birth while serving her sentence in Bindu Chowk Jail. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon, this was noticed in Delhi as the statue was whitewashed. As a temporary measure, the statue was covered with a white cloth.
The freedom fighters wanted to remove the statue from there. After that, under the leadership of former MP Shankarrao Mane, it was planned to demolish the statue again and remove it permanently. On September 13, 1943, at 4 am, former MLAs Kaka Desai, Shankarrao Mane and Shamrao Lahu Patil approached the statue pretending to be cleaning the statue with a bucket in their hands and as municipal employees. Desai stopped on the road with a revolver. Narayan Ghorpade of Wadange and one of his colleagues in police uniform were standing guard at Malkar Tikati. Shamrao Patil climbed the ladder near the statue, struck Wilson's statue with a hammer, dismembered his head, ears, nose and face, broke his arm and completely disfigured the statue. Kaka Desai, Shankarrao Mane, Shamrao Lahu Patil, Narayanrao Ghorpade, Narayanrao Jagtap, Pandurang Jagtap, Mahadev Bhau Ghatge, Pandurang Powar, Abu Jadhav, Ahmed Shabaji Mulla, Venkatesh alias Baburao Deshpande, Dr. Madhavrao Kulkarni, Vasant Balwant Tawde, Pa. Madhavrao Ghatge , Kundal Desai, all of them carried out this campaign. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon, as soon as they understood that the work was done, they all left and stayed underground for many days. Bhalji Pendharkar, an ardent devotee of Shiva, proposed to the government to erect a statue of Shivaji Maharaj at this place at his own cost. Allowed.
Chitramaharshi Baburao Painter accepted the task of making the statue and made the statue in just 18 days.
Kolhapurkar is inspiring. Statue of Shivaji Maharaj

Baburao Painter and his son Ravindra Mestri also helped a lot in making a beautiful statue of Chhatrapati Shivaji Maharaj, who was carrying a sword ready for war. Madan Mohan Lohia assisted in casting from Sugar Mill. The ceremony was held on 13th May 1945 at 6.30 pm at the hands of Prime Minister Madhavrao Bagve in the presence of Kshatra Jagadguru Maharaj, Sheth Maniklal Chunilal and Revenue Minister Bhaskarrao Jadhav. At this time, the president of Shivsmarak Samiti V. T Patil Sir, Kalamaharshi Baburao Painter, Chitratapasvi Bhalji Pendharkar, Shrimant Babaraje Khardekar, Madhavrao Bagal, J. P. Naik and other dignitaries from various fields were also present. Balveer's band, police and other entourage were present at the venue. The event started with the saffron flag of Swarajya. The memorial is inaugurated. Thousands of people present celebrated the festival by scattering flowers, cheering Chhatrapati Shivaji, distributing sweets and pedas. Kolhapurani celebrated this day of happiness by making sweets from house to house.
Today, Chhatrapati Shivaji Maharaj Chowk in Kolhapur is an uninterrupted source of inspiration and energy for all the people of Kolhapur.
Anil Patil Pethwadgaon
9890875498