बागणी किल्ला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०३ मे २०२१

बागणी किल्ला

 बागणी किल्ला 


फेसबुक लिंक http://bit.ly/3q836mz
पेठवडगाव पासुन १५ किलोमीटर वर असणारा आष्टया जवळचा वाळवा तालुक्यातील बागणी भुईकोट किल्ला उल्लेखनीय आहे, या किल्ल्याविषयी ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये विशेष माहिती उपलब्ध होत नाही

बागणी किल्ला

हा किल्ला बहुदा १७व्या शतकात बांधला गेला असावा.आष्टा हे सुमारे ३००-४०० वर्षांपासून बाजारपेठचे स्थान होते, त्याबाजारपेठेच्या रक्षणाकरिता बागणी येथील भुईकोट किल्ल्याची निर्मिती झालेली होती.वारणाकाठचे बागणी हे तीनशे वर्षापूर्वीचे नावाजलेले आणि गजबजलेले गाव होते, त्यावेळची येथे एक मोठी बाजारपेठ होती. शिवाय या जागेला ऐतिहासिकदृष्ट्याही महत्व होते. तेथे संभाजी महाराजांच्या काळाआधीपासून एक भुईकोट किल्ला होता. बागणी गावात शिरण्यापुर्वी या गावाभोवती असलेली रचीव दगडांची तटबंदी व त्यातील बुरुज आपले लक्ष वेधुन घेतात. साधारण चौकोनी आकाराचा हा किल्ला दहा एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत आजही ५ बुरुज ढासळलेल्या अवस्थेत पहायला मिळतात. कोटाच्या तीन बाजुस असलेली तटबंदी व त्याशेजारील खंदक आजही शिल्लक असुन आतील वाढत्या वस्तीमुळे कोटाची चौथ्या बाजुस म्हणजेच पूर्वेस असलेली तटबंदी व खंदक पुर्णपणे नष्ट झाला आहे. कोटाचा मुख्य दरवाजा देखील बहुदा याच भागात असावा पण तो नष्ट झाल्याने या दिशेला प्रवेशद्वाराची नव्याने सिमेंटमधील कमान उभारली आहे.तो किल्ला आजही गावातील एक प्रमुख स्थान म्हणून ओळखला जातो.आज किल्ल्याची तटबंदी आणि भग्न वास्तू शिवाय पाह्ण्या सारखे काही शिल्लक नाही.    

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव

9890875498