जनकाला या ठिकाणी सापडली होती सीता - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०९ मे २०२१

जनकाला या ठिकाणी सापडली होती सीता

   जनकाला या ठिकाणी  सापडली होती सीता  


दि. ९ मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3twYibl
रामायणातील उल्लेखांनुसार सीता म्हणजेच जानकी.जनक राजाला ज्या ठिकाणी जानकी सापडली ते ठिकाण बिहार मधील सीतामढी जिल्ह्यात आहे. जनकपूर ही राजा जनकाची राजधानी. हे स्थान आता नेपाळ देशात येते.पुनौराधाम हे स्थान त्याकाळी राजा जनकाच्या मिथिला राज्यातील राजधानी क्षेत्रात येत असल्याचे सांगितले जाते. सीता जनकाला जमीन नांगरताना सापडली असे उल्लेख पुराणात आहेत. हे ठिकाण म्हणजे पुनौराधाम. येथे सीतामातेचे भव्य मंदिर उभारले गेले असून              

सीता नवमीचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

जनकाला या ठिकाणी  सापडली होती सीता
वैशाख शुद्ध नवमी हा तो दिवस. वैष्णव संप्रदाय या दिवशी व्रत पाळतात. त्यामुळे १६ महान दानांचे फळ मिळते असा समज आहे. तसेच सर्व तीर्थस्थळांच्या वारीचे पुण्य मिळते अशीही भाविकांची श्रद्धा आहे., सीता जन्म कथा अशी की मिथीलेचा राजा जनक याला संतान नव्हते. तसेच त्याच्या राज्यात अनेक वर्षे पाउस नव्हता. यावर काय उपाय असे त्याने ऋषींना विचारले तेव्हा ऋषींनी त्याला स्वतः जमीन नांगर म्हणजे इंद्रकृपा होऊन पाउस पडेल असा उपाय सांगितला.जनकाने त्याप्रमाणे केले तेव्हा नांगराचा फाळ धातूला अडकला. तेथे खोदून पहिले तेव्हा पेटीत हि सुंदर बालिका जनकाला सापडली.
जनकाने ही बालिका देवाचा प्रसाद समजून घरी आणली आणि तिचे पालनपोषण केले. जनकाची कन्या म्हणून ती जानकी. मिथिलेची राजकन्या म्हणून ती मिथीला. पण तिचे सीता नाव ठेवले ते नांगराच्या फाळाला येथे सीत म्हणतात. त्यावरून ती सीता. मिथिला आता नेपाल मध्ये असले तरी तेथेही सीता नवमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇   
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _ጦඹիiᎢi