सापाच्या विषापेक्षाही विषारी हे झाड ! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०६ मे २०२१

सापाच्या विषापेक्षाही विषारी हे झाड !

 सापाच्या विषापेक्षाही विषारी हे झाड !


𖣘 दि. ६ मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3torQre
जगातील सर्वात विषारी झाड हे इंग्लंड मध्ये आहे.झाडांपैकी एक प्रजाती इंग्लंड मध्ये पाहिली जात असून, या झाडाच्या प्रजातीला ‘हॉगविज’ किंवा ‘किलर ट्री’ या नावाने ओळखले जाते. या प्रजातीला वनस्पती शास्त्रामध्ये ‘हेरकिलम मेंटागेजिएनम’ या नावाने ओळखले जाते. झाडांची ही प्रजाती ब्रिटनमधील लँकशर प्रांतामध्ये पहावयास मिळते. हे झाड अतिशय विषारी असून, सर्वसाधारणपणे चौदा फुटांपर्यंत या झाडाची उंची वाढते. या झाडाला चुकून जरी एखाद्याचा स्पर्श झाला, तर त्या व्यक्तीच्या हातांवर त्वरित भाजल्या प्रमाणे फोड येऊ लागतात.

सापाच्या विषापेक्षाही विषारी हे झाड !


या झाडाला स्पर्श झाल्यानंतर दोन दिवसांनी याचे परिणाम पहावयास मिळत असल्याचे वैद्यकीय तज्ञ सांगतात. हे झाड दिसावयास अतिशय आकर्षक असले, तरी हे अतिशय घातक ठरू शकते. किंबहुना हे झाड इतके विषारी आहे, की एखाद्या सापाच्या विषा पेक्षाही घातक या झाडाचे विष असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. एखाद्याने या झाडाला चुकून जरी स्पर्श केला, तरी यातील विषाच्या प्रभावामुळे त्या व्यक्तीच्या संपूर्ण अंगाची काही वेळातच असह्य लाही लाही होऊ लागत असल्याचे पहिले गेले आहे. इतकेच नव्हे तर या झाडाच्या विषाच्या प्रभावाने मनुष्याची दृष्टी जाण्याचा ही धोका उद्भवत असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. या झाडाच्या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी आज तागायत कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नसल्याचे समजते. या झाडामध्ये असलेल्या एका विशिष्ट रसायनामुळे हे झाड विषारी बनले असल्याचे वैज्ञानिक म्हणतात.
____________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ  9890875498 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________