वीजकेंद्राच्या कामामुळे फुटली पाईपलाईन; सोमवारी चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा बंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० मे २०२१

वीजकेंद्राच्या कामामुळे फुटली पाईपलाईन; सोमवारी चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा बंद

 सोमवारी चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा बंद


चंद्रपूर, ता. ३० : महानगर पालिकेच्या हद्दीत पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी इरई धरणावरुन येणारी पाईपलाईन सिटीपीएसच्या कामामुळे क्षतिग्रस्त झाल्यामुळे सोमवारी (ता. ३१) चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा बंद राहील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. सिटीपीएसच्या कामामुळे पाईपलाईन क्षतिग्रस्त झाल्याने रविवारी (ता. ३०) इरई धरणावरुन पाणीपुरवठा शहराच्या काही भागात होऊ शकला नाही. दुरुस्तीचे काम अजूनही प्रगतीपथावर आहे. त्यामुळे सोमवारी (ता. ३१) चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.