तोफांचा किल्ला रसाळगड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०१ मे २०२१

तोफांचा किल्ला रसाळगड

 तोफांचा किल्ला रसाळगड  

____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
____________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/3ucDLK0
रत्नागिरी जिल्ह्यातील रसाळगड -काही किल्ले असे असतात कि कोणत्याही मोसमांमधे  तिथे जावस वाटत. रसाळगड हा अशा किल्ल्यांपैकी एक. कोणत्याही मोसमात जा, इथला निसर्ग आपल्यला खाली हाती कधीच पाठवत नाही.पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे जाताना रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग लक्ष वेधून घेतात, खेडला पोहोचाल कि भरणा नाक्यावरून एक रस्ता डावीकडे निमानिवाडी रसाळगड कडे वळतो. आता किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी नवीन रस्ता झाला आहे. पहिली तिथून एक पायवाट होति.Ⓜ
पावसाळ्यात वाटेच्या दुतर्फा हिरवगार जंगल मध्येचं वात ओलांडताना रानडुक्कर दिसतो. झादाझुडपांमध्ये एकमेकाशी टिवल्याबावल्या करणारे मोर दिसतात. एखाद गाव हे वाड्यांपासून बनलेलं असपेठ वाडी म्हणून एक वाडी आहे.
ता अशी आपली समजूत आहे. पण इथे रसाळगड हे सात वाड्यांपासून बनलेल आहे. आता एसटी गडाच्या पायथ्याशी जाते पुढे सुरु होतो तो तांबड्या रंगाचा रस्ता एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर असा हा रस्ता. मध्येच एखाद्या ओहोलच्या थंड पाण्याचा गारेगार स्पर्श पावलांना होतो. पठारावर भात लोंब्यांवर येऊ लागलेली असतात तर कुठे हलवि भातही तयार झालेली दिसतात. निमाणी गावातून एका तासात आपण एका आधुनिक पाण्याच्या टाकीजवळ येउन पोहोचतो. या खिंडीतच महीपत सुमारगडावरून येणारी वात येउन मिळते. इथून रसाळगड अगधीच थिटूकला दिसतो. गडाच्या पायथ्याशी पुढे किल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो.दरवाज्याच्या बाजूने एक छोटीशी वाट गेली आहे. ती वाट आपल्याला सुरुंगाच्या पाण्याच्या टाक्या जवळ पोहोचवते. पहिला दरवाजा चढून पुढे जाताच समोर हनुमानच मंदिर लागत हनुमानाच दर्शन घेऊन जाताना किल्ल्याच्या एका पायरी वर काही विरगळ शिल्प आढळून येत. थोड पुढे गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो.
गडाच्या पायथ्याशी पुढे किल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो.रसाळगड नावा प्रमाणे रसाळ आहे.गडाचा घेरा ५ ते ७ एकर पेक्षा जास्त नाही. पण एवढ्याशा किल्ल्यावर १६ तोफा आहेत. दुसरा दरवाजा ओलांडून झाल्या नंतर आपण गडावर पोहोचतो.

तोफांचा किल्ला रसाळगड
सुरुवातीलाच एक मोठी तोफ आढळून येते. पुढे गेल्यावर झोलाई वाघजाई देवीच मंदिर आहे. ह्या मंदिराच्या कोनाड्यात अनेक देव – देवतांचे मुर्त्या आढळून येतात. मंदिराच्या शेजारी एक पाण्याचा तलाव आहे, हे पाणी पिण्या योग्य आहे. तसेच तलावाच्या बाजूला गणपतीच मंदिर आहे. मंदिरच्या बाजूला बालेकिल्ल्यचा अवशेष आहे. तसेच त्यला छोटे बुरुज आहेत. ह्या किल्ल्यावर दर तीन वर्षांनी झोलाई देवीची जत्रा असते.
किल्ल्याच्या थोड पुढे गेल्यवर शंकराची पिंड आहे तसेच नंदिहि आहे.. पेठवाडी गावातील सकपाळ हे या देवीचे गुरव असून ते कान्होजी आंग्रे यांचे वंशज असल्याचे सांगतात. आंग्रे यांचे मूळ आडनाव सकपाळ होते.किल्ल्यावर पूर्वी धान्य साठवण्या साठी धान्य कोठार तयार करण्यात आली होती ती आजही चांगल्या अवस्थेत आहे . किल्ल्याच्या भोवती पाच पांडवांनी बांधलेले ७ पाण्याचे टाके ( खांबटाका ) आहेत. पण यातील एकच खांबटाका पाहतो यातून कारण पुढे रस्ता खूप अवघड आहे.

१६६० च्या मोहिमेत शिवाजीराजांनी रसाळगड जिंकला आणि पुढे १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे यांनी पुन्हा रसाळगड घेतला. नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रेकडून सर्व किल्ले घेतले रसाळगड तेवढा राहिला. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळगड त्यांच्या ताब्यात आला असावा.जंजिरेकर सिद्दी विरुद्ध इ. स. १७३३ साली मराठ्यांनी उघडलेल्या मोहिमेच्या वेळी संभाजी आंग्रे बाणकोट येथे होते. तेथून ते कुलाब्याला न जाता रसाळगडवर जाणार होते, अशी माहिती आंग्रे शकावली मध्ये शं. ना. जोशी देतात. सप्टेंबर १७३३ मध्ये संभाजी आंग्रे रसाळगडावर येऊन गेले होते.किल्यावर तोफा जास्त असल्याने हा तोफांचा किल्ला म्हणुन प्रसिद्ध आहे

____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
9890875498
____________________________