मोबाईल लुटणारा पोलिसांच्या ताब्यात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

३० मे २०२१

मोबाईल लुटणारा पोलिसांच्या ताब्यात

मोबाईल लुटणारा पोलिसांच्या ताब्यात
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात )
रस्त्यांनी पायदळ जाणाऱ्या इसमाला दोन भामटयानी थांबवून मारपिट करीत मोबाईल व पैसे हिसकावून पळ काढणाऱ्या एका आरोपींना वाडी पोलिसांना अटक केली. प्राप्त पोलीस माहितीच्या सूत्रानुसार फिर्यादी अमोल गोविंदराव मेश्राम वय ३४ वर्ष रा. जुनी वस्ती दाभा यांनी तेलीपुरा नागपूर येथील न्यू मॅजिक मोबाईल या दुकानातून टेक्सो कंपनीचा नवीन मोबाईल अंदाजे किंमत ७८०० रुपयांचा विकत घेतला होता.फिर्यादी रविवार ३० मे रोजी दुपारी ४ .३० वाजताच्या दरम्यान अमरावती राष्ट्रीय महामार्गावर दाभाकडे जात असताना दुचाकीवरून २२ते २५ वयोगटातील दोन मुलांनी आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याकडे दुर्लक्ष करीत पायी मारुती शोरूमकडे जात असताना वायुसेनाकडे जाणाऱ्या रोडवर आरोपीने पाठीमागून येऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपात नेऊन नवीन मोबाईल व नगदी १५० रुपये जबरदस्तीने हिसकावून फिर्यादीला ढकल्याने डोक्याला मार लागला होता.फिर्यादी अमोल मेश्राम यांच्या तक्रारीनुसार वाडी पोलिसांनी आरोपी पिंटू सुग्रीव राजभर वय २० वर्ष रा. पिली नदी यशोधरा नगर नागपूर या एका आरोपीस अटक केली आहे. वाडीचे ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंढे, पोलीस उपनिरिक्षक अविनाश जायभाये, पोलीस काँन्सटेबल सुनील मस्के,सुनील भट,सतीश येसनकर पुढील तपास करीत आहे.