रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या डॉक्टर व नर्सला चंद्रपुरात अटक: एकूण 5 अटकेत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०८ मे २०२१

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या डॉक्टर व नर्सला चंद्रपुरात अटक: एकूण 5 अटकेत

चंद्रपूर/खबरबात:
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अन्न व औषध विभागाने रंगेहात पकडले आहे.तर शहरातील क्राईस्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रभारी डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना काळाबाजाराप्रकरणी रात्री अटक करण्यात आली आहे. क्राईस्ट रुग्णालयातील या गैरप्रकारात डॉक्टरला मदत करणाऱ्या 2 नर्सेसला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. हा काळाबाजार करणाऱ्या एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

आशय उराडे आणि प्रदीप गणवीर, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. ही कारवाई गांधी चौक जवळील पुगलीया गल्ली येथे आज दुपारच्या सुमारास करण्यात आली. हे दोघेही प्रत्येकी 25 हजार रुपयाला इंजेक्शन विकणार असल्याची माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली होती. त्यानंतर अन्न व औषध विभाग व शहर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.