आदिवासी, दुर्गम भागात जनजागृतीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२२ मे २०२१

आदिवासी, दुर्गम भागात जनजागृतीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट

आदिवासी, दुर्गम भागात जनजागृतीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट

100% लसीकरण करून आपले गाव कोरोना मुक्त करण्यास मदत करावी-
- उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले

झूम मीटिंगमध्ये ७० ग्रामपंचायती सोबत साधला संवाद

लसीकरणासाठी तालुक्यात जनजागृती मोहीमसंजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.२१मे:-
अर्जुनी मोरगाव उपविभाग अंतर्गत येणाऱ्या अर्जुनी मोरगाव व सडक-अर्जुनी या दोन्ही तालुक्यात उपविभागीय स्तरांवर लसीकरण व कोरोना चाचण्या मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आल्यामुळे या दोन्ही तालुक्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात असून लसीकरणाचा वेग वाढावा, यासाठी लसीकरण व कोरोना चाचण्या अधिकाधिक व्हाव्या, यासाठीची आपण जनजागृतीची मोहीम हाती घेतली असून, दोन्ही तालुक्यातील आदिवासी ग्रामीण व दुर्गम भागात प्रत्यक्ष भेटीद्वारे पाहणी करून लोकांमध्ये जनजागृतीच्या दृष्टीने आढावा घेत असल्याची माहिती अर्जुनी मोरगाव च्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी दिली. त्या दिनांक 18 मे रोज मंगळवार ला नवेगावबांध येथे ग्रामीण रुग्णालयात रॅपिड अँटीजन टेस्ट, लसीकरण केंद्र, आरोग्यवर्धिनी उपकेंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन याबाबतचा आढावा घेण्यासाठी आल्या असता, बोलत होत्या. लसीकरणामुळे मानवी आरोग्यावर कुठल्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होत नाही. लसीकरण व कोरोना चाचण्या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे आवाहन नागरिकांना केले. नवेगावबांध सह अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कन्हाळगाव भरनोली,इळदा या आदिवासी दुर्गम भागात दिनांक 19 मे बुधवार ला तालुका अधिकाऱ्यांसह त्यांनी भेटी दिल्या. लसीकरणाची, कोरोना तपासणी व नागरिकांचे सहकार्य, त्यांच्यात करण्यात येणारी जनजागृती याबाबतचा आढावा स्थानिक ग्रामपंचायत मध्ये बैठक घेऊन अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या कडून माहिती जाणून घेतली. तसेच लसीकरण मोहिमेचा वेग वाढवावा, लोकांमध्ये जागृती घडवावी, लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे, गावात शंभर टक्के लसीकरण व्हावे.असे निर्देश त्यांनी यावेळी स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी ग्राम कोविड पथक यांना दिले.कन्हाळगाव येथील महिला पुरुष ग्रामस्थांची भेट घेऊन तसेच लसीकरण झालेल्या महिला पुरुषांची आस्थेने चौकशी त्यांनी केली. त्यामुळे ज्यांचे लसीकरण झाले आहे, अशा महिला, पुरुषांनी गावातील इतर लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. असे आव्हान त्यांनी ग्रामस्थांना केले. यावेळी अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार विनोद मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय राऊत, तालुक्याचे खंडविकास अधिकारी यु.टी.राठोड, पोलीस निरीक्षक संदीप इंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पिंकू मंडल, स्थानिक तलाठी, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
दिनांक २० मे रोज गुरुवार ला तहसील कार्यालय अर्जुनीमोरगाव येथे उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींना झूम मीटिंगमध्ये सहभागी करून संवाद साधला.100% लसीकरण करून आपले गाव कोरोना मुक्त करण्यास मदत करावी. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. करण्यात आले सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, कोरोना गाव समिती ग्राम कोरोना पथक यांच्याशी संपर्क साधून लसीकरण मोहीम आपल्या गावात शंभर टक्के यशस्वी करावी तसेच याबाबतची जनजागृती गावागावात करावी. असे आव्हान यावेळी त्यांनी केले. तहसील कार्यालयात झूम सभेला तहसीलदार विनोद मेश्राम तालुका आरोग्य अधिकारी विजय राऊत, गटविकास अधिकारी यु.टी. राठोड उपस्थित होते.२० मे पर्यंत आतापर्यंत तालुक्‍यात १०६७७ रॅपिड अँटीजन टेस्ट,तर १०९३५ आरटी पीसीआर टेस्ट करण्यात आल्यात. पर्यंत २७१६ बाधित रुग्ण आढळले. ५१ रुग्ण मृत्युमुखी पडले.सक्रीय रुग्ण संख्या ११५ असून,गृहवीलगिकरणात २५६ रुग्ण आहेत.तालुक्यात ९लसीकरण केंद्र कार्यरत आहेत.