म्हणुन भारतीय सैन्यात “मुसलमान रेजिमेंट” नाही - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०२ मे २०२१

म्हणुन भारतीय सैन्यात “मुसलमान रेजिमेंट” नाही

 म्हणुन  भारतीय सैन्यात “मुसलमान रेजिमेंट”  नाही  


दि. २ मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3nD98eg
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले.साहजिकच सैन्य दलामध्ये बदल करण्यात आला. भारतीय सेनेत मराठा, जाट, शीख रेजिमेंट आहे, मग मुस्लीम रेजिमेंट का नाही. हा प्रश्न आपल्या मनात येत असेल।   

म्हणुन  भारतीय सैन्यात “मुसलमान रेजिमेंट”  नाही
   

  प्रथम आपण रेजिमेंट म्हणजे काय? हे पाहु.रेजिमेंट हा शब्द रेजिमीन या शब्दापासून तयार झाला आहे. या लॅटिन शब्दाचा अर्थ म्हणजे नियमांची व्यवस्था. रेजिमेंटल सिस्टीम सर्वात आधी इंफेंट्री मध्ये आले. म्हणूनच रेजिमेंट म्हटल की आजही आपल्याला हातात बांधून घेतलेले पायदळ सैन्यच आठवत.इंफेंट्रीमध्ये रेजिमेंट म्हणजे एक असे सैन्य तुकडी ज्यांचा स्वतःचा एक इतिहास आणि स्वतःची एक पद्धत असेल. प्रत्येक रेजिमेंटचा आपला वेगळा झेंडा, निशाण आणि वर्दी असते.आपण वाचत आहात माहिती सेवा पेठवडगाव ची पोस्ट, एका रेजिमेंटमध्ये अनेक बटालियन असतात. प्रत्येक बटालियनचा एक नंबर असतो.भारतात रेजिमेंटची सुरवात इंग्रजांनी केली. त्यासाठी एक थेरी देण्यात आली ज्यानुसार काही समुदायातून येणारे लोकं जास्त लढवय्ये असतात, जसे की, पठाण, कुरेशी, अहिर आणि राजपूत. यांना मार्शल रेस समजण्यात येते. तर इतर समुदायांना नॉन मार्शल रेस म्हटल्या जाते. याप्रकारे क्षेत्र आणि जातीच्या आधारे रेजिमेंट बनल्या.भारत स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटीश इंडियन आर्मीचे विभाजन झाले. एक भाग इंडियन आर्मी बनला आणि दुसरा पाकिस्तान आर्मी. मुसलमान सैनिक जास्त करून उत्तर पश्चिम येथून होते.त्यामुळे ते पाकिस्तानच्या सैन्यात सामील झाले, कारण त्यांचे घर तिथे होते. म्हणून भारतीय सैन्यात मुसलमानांची संख्या कमी राहिली. पण याचा अर्थ असा नाही मुसलमानांना अगदी वेगळं केल्या गेलं!पाकिस्तान विरुद्ध १९६५ मध्ये झालेल्या युद्धात खेमकरणच्या युद्धात ४ ग्रेनेडीयरचे हवालदार अब्दुल हामिद यांना वीरमरण आले. त्यांच्या विरमरणाचा सन्मान म्हणून त्यांना परमवीर चक्र देण्यात आले. लढणारे सैनिक हे भलेही एका समाजाने असो तरी त्यांचे ऑफिसर हे कुठल्याही धर्माचे असू शकतात. परमवीर चक्र विजेते मनोज पांडे हे गोरखा नव्हते. तरी कारगिल युद्धातलढताना जेव्हा ते शहीद झाले, तेव्हा ते ११ गोरखा रायफल्सचे अधिकारी होते.सैन्यात असे म्हटले जाते की,“अधिकाऱ्यांचा कुठलाही धर्म नसतो. त्याच्या सैनिकांची तुकडी हाच त्याचा धर्म असतो”.ब्रिटीश इंडियन आर्मी तसेच भारतीय थलसेनेत कधीच मुस्लीम रेजिमेंट नव्हती. पण इंफेंट्री बटालियनमध्ये मुसलमानांच प्रतिनिधित्व नेहेमी मिळत राहिलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धात जेव्हा राजपूत रेजिमेंट लढत होती तेव्हा त्यामध्ये अर्धे हे राजपूत तर अर्धे सैनिक हे मुसलमान होते. तसेच इंडियन आर्मीच्या ग्रेनेडियर रेजिमेंटमध्ये अर्धेसैनिक हे मुस्लीम असतात.ग्रेनेडियर रेजिमेंटमध्ये भरती होणारे मुसलमान हे जास्त करून राजस्थान या राज्यात राहणारे कायमखानी मुसलमान असतात. तर इतर समाजातील मुस्लिम्स देखील या रेजिमेंट मध्ये भरती होतात. याचप्रमाणे जम्मू-कश्मीर लाईट इंफेंट्रीमध्ये देखील अर्धे सैनिक हे मुसलमान असतात.या व्यतिरिक्त सेनेच्या आर्टिलरी आणि आर्मड कोर यामध्येही मुसलमान असतात. जसे नॉन मार्शलसमजण्यात येणारे लोकं देखील आज सैन्यात भरती होतात, हे त्याच प्रकारचं आहे.
भारतात कुठलही मुस्लीम रेजिमेंट नाही, पण आपल्या सैन्यात मुस्लीम जवान देखील आहेत जे तेवढ्याच आत्मीयतेने आणि शुरतेने आपल्या देशाचे रक्षण करतात जसे इतर कुठल्याही रेजिमेंटचे जवान करतात. आजसुद्धा सैन्य दलात मुस्लिम लोक आहेत.व ते विविध पदावर कार्यरत असुन देशाचे रक्षण करत आहेत.आजही अनेक मुस्लिम युवक सैन्यात भरती होण्यासाठी उत्सुक आहेत,त्यांना गरज आहे योग्य मार्गदर्शनाची.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇      
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _*ጦඹիiᎢi*_