२८ मे २०२१
वाडीतील प्रलंबित शासकीय रुग्णालयाची युवक काँग्रेसला चिंता!
पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांना निवेदन देऊन वेधले लक्ष!
नागपूर /अरुण कराळे ( खबरबात )
वाडी नगर परिषद क्षेत्र हा विदर्भाचा ट्रान्सपोर्ट हब ,राष्ट्रीय महामार्ग ,हजारो गोडाऊन व एक लाख लोकसंख्या असूनही उपचारासाठी साधे शासकीय रुग्णालय नसल्याने नागरिकाना अत्यंत त्रासाचा सामना करावा लागत आहे.ही गंभीर बाब हिंगणा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवार २८ मे रोजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना भेटून वाडीत तातडीने शासकीय रुग्णालय निर्माण करावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली.जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत हे हिंगणा स्थित रुग्णालया मध्ये पाहणी करण्यासाठी शासकीय दौऱ्यावर आले असता अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्य कुंदाताई राऊत यांच्या नेतृत्वात अश्विन बैस यांनी नामदार डॉ. नितीन राऊत यांना हे निवेदन सादर केले.
या निवेदनानुसार वाडीतील जनता शासकीय रुग्णालय नसल्याने डेंगू व कोरोना महामारी सोबत सामान्य आजारातही उपचार मिळत नसल्याने व त्यामुळे नाईलाजाने महागडे खाजगी उपचार घ्यावे लागत आहे.या प्रलंबित समस्या मुळे जनता त्रस्त व संतप्त आहे.वाडीत शासकीय दवाखान्याची निर्मिती व्हावी यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व तत्कालीन केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी पुढाकार घेऊन वाडी परिसरातील नवनीत नगर येथील एक आरक्षित जागा या दवाखान्यासाठी उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही केली होती.त्यानंत वाडी नगर परिषद ने या आशयाचा एक प्रस्ताव नागपूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुंबई मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला.मात्र या बाबीला सात वर्षाचा कालावधी उलटूनही वाडीतील शासकीय रुग्णालयात घोडे कुठे अडले व हा प्रस्ताव मंजूर का झाला नाही या बाबतचा ठावठीकाणा कुणालाही कसा दिसत नाही. सध्या आजाराच्या संकटात व आकस्मिक ,दुर्घटना प्रसंगी नागरिकांना उपचारासाठी नागपूर किंवा हिंगणा परिसरसतील रुग्णालयात जावे लागते त्यामुळे रुग्ण व परिवाराना अत्यंत त्रासाचा सामना करावा लागत आहे. ही बाब युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ.नितीन राऊत त्यांच्या निदर्शनास आणून देऊन मंत्रालयात असलेला प्रलंबित दवाखान्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून वाडीत दवाखाना निर्मितीची कारवाई अग्रक्रमाने करावी अशी विनंती केली.त्यांनी तातडीने याबाबतची माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.निवेदन सादर करतांना युवक काँग्रेसचे पदाधिकारी शशिकांत थोटे,मिथुन वायकर ,पियुष बांते ,शुभम पिंपळशेंडे उपस्थित होते.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
