कोल्हापूर: चिमासाहेब महाराजा समाधी कराची - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१५ मे २०२१

कोल्हापूर: चिमासाहेब महाराजा समाधी कराची


🔹 कोल्हापूर: चिमासाहेब  महाराजा समाधी  कराची 🔹फेसबुक लिंक http://bit.ly/2QjoubF
दि १५ मे २०२०
कोल्हापूरातील भवानी मंडप म्हणजेच जुना राजवाडा परिसर या राजवाड्याच्या परिसरात उठावाचा इतिहास आहे. चिमासाहेब महाराज, फिरंगोजी शिंदे व अन्य सहकाऱ्यांच्या जीवाची बाजी त्यासाठी लागली आहे. उठावात सहभागी असलेल्यांना या राजवाड्याच्या परिसरात गोळ्या घालून ठार मारल्याचा क्रांतिकारी इतिहास आहे.

कोल्हापूर: चिमासाहेब  महाराजा समाधी  कराची

१८५७ च्या उठावाची एक ठिणगी कोल्हापूरात देखील पडली होती. १८५७ चा उठाव कोल्हापूर संस्थानात देखील झाला होता त्या उठावाचे नेते होते कोल्हापुरचे महाराज चिमासाहेब.
२६ डिसेंबर १८३० साली बुवासाहेब महाराज आणि आनंदीबाई यांच्या पोटी शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराजांचा जन्म झाला. तर बुवासाहेब महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी नर्मदाबाई यांच्या पोटी शाहू उर्फ चिमासाहेब महाराजांचा जन्म झाला.
२९ नोव्हेंबर १८३८ रोजी बुवासाहेब महाराज यांचं अकाली निधन झालं. तेव्हा गादीवर आठ वर्षांचे शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराज आले. गादीवर आलेले बाबासाहेब महाराजांचा स्वभाव शांत आणि मवाळ होता पण त्यांचे धाकटे बंधू चिमासाहेब हे करारी होते.याच चिमासाहेब महाराजांच्या बहिणीचे नातू म्हणजे 'राजर्षी शाहू' महाराज.
दिनांक ३१ जुलै १८५८ .
त्याकाळी कोल्हापूर आजच्यासारखं पसरलेलं नव्हतं. शहराला तटबंदी होती. शहराचं स्वरुप एखाद्या किल्यासारखं होतं. ६ वेशी, सभोवती मोठ्ठा खंदक, ४८ बुरूज आणि त्यांवर शहराच्या सुरक्षेसाठी सज्ज असणाऱ्या तोफा असत. रोज रात्री ८ वाजता कोल्हापूरच्या वेशी बंद होत. त्यानंतर कोणत्याही व्यक्तीला कोल्हापूरात प्रवेश करता येत नसे.
कोल्हापूर संस्थान आणि इंग्रजांमध्ये करार झालेला असल्यानं कोल्हापूरात इंग्रजांची २७ पलटण ठाण मांडून असे.

३१ जुलैच्या रात्री हिंदूस्थानच्या आसमंतात आरोळी घुमली “मारो, फिरंगीओंको.”
हाच तो क्षण होता, कोल्हापूरात झालेल्या १८५७ च्या उठावाचा. हा उठाव कोल्हापूरात झाला म्हणून महत्वाचा नव्हता तर संबंध दक्षिण हिंदूस्तानातल्या उठावाची ती पहिली ठिणगी होती.
२७ पलटणीतल्या सुमारे २०० सैनिकांनी इंग्रज सेनाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर चाल केली. पण उठावाची कुणकुण इंग्रज अधिकाऱ्यांना अगोदरच लागल्याने त्यांनी पळ काढला होता. शिपायांनी इंग्रजांनाच्या खजिन्याकडे चाल केली. खजिन्यावर हल्ला करत सुमारे ४० ते ५० हजार रुपयांची रक्कम लुटण्यात आली. या उठावाचा नेतृत्व करत होते रामजी शिरसाट.
त्यानंतर शिपायांनी आपला मोर्चा कोल्हापूर शहराच्या दिशेने वळवला. मात्र बिंदू चौकाचे दरवाजे बंद होते. आतील लोकांना उठावाचा निरोप न मिळाल्यामुळे हे दरवाजे सकाळीच उघडण्यात आले.
इंग्रजांच्या फौजा मागावर असल्याने शिपायांना पळून जाणं भाग पडलं. याच वेळी उठावाची माहिती मिळाल्याने पळून गेलेले इंग्रज अधिकारी शिपायांना सोळांकूरच्या व्यंकनाथाच्या मंदिरात लपून बसलेले दिसले. शिपायांनी या तिन्ही इंग्रज अधिकाऱ्यांना ठार केले. उठावाची तोपर्यंतची निष्पत्ती होती ३ इंग्रज ठार आणि ५० हजारांचा सरकारी खजिना ताब्यात आला होता.
इंग्रज अधिकाऱ्यांच्या मुंबईच्या फौजा दाखल होवू लागल्या.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,पुढे बेळगावहून आलेल्या लेफ्टनंट केर साहेबांच्या पलटणीने उठावातील काही शिपायांना घाटातील राधाकृष्णाच्या मंदिरात पकडलं. मंदिरात असणारे चाळीस शिपाई विरुद्ध केर साहेबांची घोडेस्वारांची मोठ्ठी पलटण असा सामना झाला यात ४० शिपायांना हौतात्म्य आलं.
ही हकिकत मुंबई सरकारला कळताच मुंबईहून कर्नल जेकब यांना उठावाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवण्यात आलं. कर्नल जेकब यांनी कठोर कारवाई करत हा उठाव मोडून काढला. १८ ऑगस्ट रोजी ८ जणांना  तोफेच्या तोंडी देण्यात आलं. २ जणांना फाशी ११ जणांना जाहिररित्या गोळ्या घालण्यात आल्या.
इंग्रज अधिकारी विचारत राहिले की बंड नेमकं कुणामुळे झालं..? बंडामागे नेमकं कोण होतं…?  एकाही शिपायाने तोंड उघडलं नाही, पण कर्नल जेकब यांचा शोध थांबला नाही.असाच उठाव ६ डिसेंबरच्या रात्री देखील झाला. शिपायांकडून राजवाड्यावर चाल करण्यात आली. उठावातील शिपायांना विश्वासघातामुळे शरणागती पत्करावी लागली. कोर्टाच्या आदेशानुसार ४ जणांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं तर ३२ जणांना गोळ्या घालण्यात आल्या.
कर्नल जेकबच्या चाणाक्ष नजरेनं चिमासाहेबांची करारी नजर ओळखली.लागोपाठ दोन उठाव झाले पण उठावाच्या पाठिमागे कोण होतं याचा शोध मात्र लागत नव्हता. जेकबला चिमासाहेबांवर संशय आला.
दुसऱ्या दिवशी चिमासाहेबांना बोलावून घेण्यात आलं. ही बातमी कोल्हापूरच्या नागरिकांना समजताच सबंध कोल्हापूर रस्त्यांवर उतरलं. परिस्थितीचा अंदाज घेऊन कर्नल जेकब यांनी चौकशी तात्काळ थांबवली.
कर्नल जेकब यांनी चिमासाहेबांना काहीतरी कारण सांगून बोलावून घेतलं.पूर्वीसारखा गोंधळ नको म्हणून महाराजांना रात्री बोलावण्यात आलं. यावेळी पुर्णपणे गुप्तता पाळण्यात आली. महाराजांना चौकशीच्या निमित्ताने अटक करण्यात आली.त्याच रात्री चिमासाहेबांना आधी वाघाटणे बंदरातून मुंबई आणि मुंबईमधून पुढे कराचीला नेण्यात आलं. १२ मे १८५८ रोजी चिमासाहेब कराची येथे पोहचले. महाराज आता कैदी होते. भारतापासून कोल्हापूरपासून कौसो दूर कराचीमध्ये.
१५ मे १८६९ रोजी चिमासाहेबांच निधन झालं. लिहारी नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काही वर्षांनी स्थानिक लोकांनी तिथे महाराजांची समाधी बांधली. आजही कराचीमध्ये ती समाधी आहे.
कोल्हापूरच्या रक्तात ज्यांनी क्रांतीची बीजे पेरली त्या महाराजांनी ती समाधी आज दुर पाकिस्तान मध्ये आहे.तर कोल्हापूरात सीपीआर हॉस्पिटल समोर टाऊन हॉल बागेत चिमासाहेब महारांजाचा पुतळा आहे.

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
====================================

Kolhapur: Chimasaheb Maharaja Samadhi Karachi


-----------------------------------------
mahiti seva Group Pethwadgaon
-----------------------------------------
Facebook link http://bit.ly/2QjoubF
May 15, 2020
The Bhavani Mandap in Kolhapur, the old palace complex, has a history of uprisings. The lives of Chimasaheb Maharaj, Firangoji Shinde and other colleagues are at stake. There is a revolutionary history of those who took part in the uprising being shot dead in the vicinity of the palace.
A spark of the uprising of 1857 had also fallen in Kolhapur. Maharaj Chimasaheb of Kolhapur was the leader of the uprising of 1857 which also took place in Kolhapur state.
Shivaji alias Babasaheb Maharaj was born on December 26, 1830 to Buvasaheb Maharaj and Anandibai. Shahu alias Chimasaheb Maharaj was born to Narmadabai, the second wife of Buwasaheb Maharaj.
Buwasaheb Maharaj passed away prematurely on 29th November 1838. Then eight year old Shivaji alias Babasaheb Maharaj came to the throne. Babasaheb Maharaj who came to the throne was calm and gentle but his younger brother Chimasaheb was Karari. The grandson of Chimasaheb Maharaj's sister is 'Rajarshi Shahu' Maharaj.
Dated July 31, 1858.
At that time, Kolhapur was not as widespread as it is today. The city was fortified. The city looked like a fort. There were 6 gates, a large moat around them, 48 towers and guns on them for the security of the city. The gates of Kolhapur were closed every night at 8 o'clock. After that no one could enter Kolhapur.
As there was an agreement between Kolhapur Sansthan and the British, 27 British regiments were stationed in Kolhapur.
On the night of 31st July, there was an uproar in the skies of Hindustan.
That was the moment of the uprising of 1857 in Kolhapur. This uprising was not as important as it happened in Kolhapur, but it was the first spark of the uprising in South India.
About 200 soldiers from 27 battalions marched on the bungalow of a British army officer. But the British authorities had already heard of the uprising and had fled. The soldiers marched on the British treasury. About 40,000 to 50,000 rupees were looted from the treasury. This uprising was led by Ramji Shirsat.
The soldiers then marched towards Kolhapur city. But the doors of Bindu Chowk were closed. The doors were opened in the morning as the people inside did not get a message to rise.
The British troops were on the trail, forcing the soldiers to flee. At the same time, on hearing of the uprising, the fleeing British officers found the soldiers hiding in the temple of Venkanatha in Solankur. The soldiers killed the three English officers. The uprising had ended with the death of three Englishmen and the seizure of a government treasury of Rs 50,000.
The Mumbai troops of the British officers started arriving. You are reading the post of the information service group Pethwadgaon. Forty soldiers in the temple were killed by a large cavalry regiment of Ker Saheb.
As soon as the Mumbai government came to know about this fact, Colonel Jacob was sent from Mumbai to deal with the uprising. Colonel Jacob cracked down on the uprising. On August 18, eight people were shot dead. Two were hanged and 11 were publicly shot.
British officials kept asking who caused the revolt ..? Who exactly was behind the rebellion? Not a single soldier opened his mouth, but the search for Colonel Jacob did not stop. A similar uprising took place on the night of December 6. The soldiers marched on the palace. The uprising soldiers had to surrender due to betrayal. According to the court order, 4 people were shot and 32 people were shot.
Colonel Jacob's shrewd eyes recognized Chimasaheb's agreement. There were two uprisings in a row but it was not possible to find out who was behind the uprisings. Jacob became suspicious of Chimasaheb.
Chimasaheb was called the next day. As soon as the citizens of Kolhapur understood this news, they took to the streets of Kolhapur. Anticipating the situation, Colonel Jacob immediately stopped the inquiry.
Colonel Jacob summoned Chimasaheb for some reason. The Maharaja was summoned at night so as not to cause any confusion like before. This time, complete secrecy was maintained. Maharaj was arrested on the occasion of interrogation. On the same night, Chimasaheb was first taken from Waghatne port to Mumbai and from Mumbai to Karachi. On 12 May 1858, Chimasaheb reached Karachi. Maharaj was now a prisoner. Kauso away from Kolhapur in India to Karachi.
Chimasaheb himself died on 15th May 1869. He was cremated on the banks of the Lihari River. A few years later, the locals built the Maharaja's Samadhi there. She is still buried in Karachi.
The mausoleum of the Maharajah who sowed the seeds of revolution in the blood of Kolhapur is now in distant Pakistan.
mahiti seva Group Pethwadgaon
98908754