स्वराज्याचे शूर सेनानी जोत्याजी केसरकर समाधी पुनाळ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०७ मे २०२१

स्वराज्याचे शूर सेनानी जोत्याजी केसरकर समाधी पुनाळ

स्वराज्याचे शूर सेनानी जोत्याजी केसरकर समाधी पुनाळ 


फेसबुक लिंक http://bit.ly/3ttq9cb
छ. संभाजी महाराज यांना मुकबरखानाने संगमेश्वर मुक्कामी फितुरीने पकडले त्यावेळी सेनापती म्हाळोजी घोरपडे व अनेक वीर या प्रसंगी धारातिर्थी पडले. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्या सोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले होते.यावेळी संभाजी राजांचे अंगरक्षक ज्योत्याजी केसरकर हजर नव्हते.राजाना पकडल्यानंतर मुकबरखानाने त्यांना आौंरगजेब पुढे हजर करण्यासाठी बहाद्दुरगडाकडे घेऊन निघाला.संगमेश्वरातुन बहाद्दुरगड साडेतिनशे मैल दुर होता.ज्योत्याजी केसरकर यांना ही बातमी कळल्याबरोबर ते चवताळून ऊठले.तोवर मुकबरखान बत्तीस शिराळा या भुईकोट किल्ला जवळ आला होता.,फक्त शंभर मावळे घेऊन जोत्याजी मोघलांवर तुटून पडले.हातघाईची लढाई झाली.यावेळी सोबत ऊदाजी चव्हाण पण होते.प्रचंड संख्येने असलेल्या मोगलापुढे मावळ्यांचे काही चालले नाही,या लढाईत काही सैनिक मारले गेले तर काही जखमी झाले,ज्योत्याजी केसरकर पण जखमी झालेने शिराळयाच्या जंगलात एकटे पडले.व छ संभाजी महाराजाना सोडविण्याचा प्रयत्न फसला.पुढे इतिहास काहीच कळत नाही.पुढे त्यांचे नाव येते सातारा येथील संभाजी पुत्र शाहुराजाच्या दरबारात.शाहू महाराजांनी त्यांना सरदेशमुखी दिली, १८ कारखान्याचा अधिकार दिला. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून सातारा शहरात केसरकर पेठही वसवली.त्यांच्या मुत्युची तारीखही इतिहास सांगत नाही.पण त्यांची समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील यवलुज जवळील "पुनाळ" या गावी आहे.ही समाधी पन्हाळयाचे इतिहास संशोधक गुळवणी यांनी शेधुन काढली.अशा या थोर योध्याला मानाचा मुजरा.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498


जोत्याजी केसरकर समाधी

जोत्याजी केसरकर समाधी