परांडा किल्ला अहमदनगर निजामशहाच्या ताब्यात आला. इ.स. १५२२ मध्ये आदिलशहाने किल्ला मिळवला खरा; पण तो काही काळापुरताच. निजामाने किल्ला परत घेतला ते अगदी सतराव्या शतकात निजामशाहीच संपेपर्यंत. इ.स. १६०० मध्ये मुगल सैन्याने चांदबीबीच्या नेतृत्वाखाली अहमदनगरचा किल्ला लढवत असलेल्या निजामशाही सैन्याचा पाडाव केला. ताबडतोब मुत्सद्दी निजामशाही सरदार मलिक अंबरने मुर्तझा निजामशहा दुसरा याला गादीवर बसवून काही काळ परांडा किल्ल्यात राजधानी हलवली आणि मुगलांविरुद्ध लढा सुरूच ठेवला. पुढे ही राजधानी दौलताबादला असताना जिजाऊंचे वडील लखुजी जाधव आणि त्यांच्या भावांची हत्या निजामशाही दरबारात झाली तेव्हा शहाजीराजे परांडा किल्ल्यात वास्तव्याला होते. तेव्हा ते निजामशाही सोडून आदिलशाहीला मिळाले.रंडका किल्ला म्हणुन समज असला तरी किल्ल्यांवर बऱ्याच लढाया झाल्या आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,भारतातील नावाजलेली विजापूरच्या सर्जा बुरुजावरील मुलुखमैदान (मलिक-इ-मैदान) तोफ १६३२ पर्यंत परंड्याच्या बुरुजावर होती. साधारणपणे २२ मे १६३२ ला विजापूरच्या आदिलशहाचा दिवाण मुरार जगदेवने १० हत्ती आणि ४०० बैलांच्या साह्याने ५५ टन वजनाची ही तोफ विजापूरला नेली. त्यापूर्वी नगरचा दिवाण मलिक अंबरने सोलापूरवर तिचा वापर केला होता.१६६५ मध्ये मिर्झाराजाने पुण्यावर आक्रमण केले होते. तेव्हा मोगलांना धडा शिकवावा म्हणून छत्रपती शिवरायांनी सेनापती नेताजी पालकरला मोगली प्रांतावर आक्रमण करण्यास सांगितले. तेव्हा नेताजीने परंडा किल्ल्या भोवतीच्या परिसरात धुमाकूळ माजविला होता.बरीच वर्षे औरंगजेब दक्षिणेतच राहिल्यामुळे उत्तरे कडील जमा होणा-या महसुलाचा पैसा विजापूर, सोलापूर, हैदराबाद, कोल्हापूर परिसरात जाताना तो परंड्यात येत होता व नंतर इतरत्र पाठवला जात होता.असेच एकदा परंड्याहून निघालेला खजिना सेनापती धनाजी जाधवा यांनी २५ जानेवारी १७०० मध्ये परंड्याजवळील उंदरगाव या ठिकाणी लुटला होता अशी इतिहासात नोंद सापडते.
औरंगजेब पुत्र शहजादा मुहंमद शुजा व महाबत खान,राजा जयसिंग, अल्लावर्दीखान, पहाडसिंघ बुंदेला,राजा संग्राम यांच्या साहाय्याने परंडा किल्यावर स्वारी केली.त्यावेळी परंड्याचा किल्लेदार हा सिद्दी फरहान होता.मोगलानी तटावर तोफगोळे फेकले.सुरूंग व भुयार खंदुन लढाईला सुरूवात केली.या धुमश्चक्रीत परंड्याचा किल्लेदार सिद्दी फरहान ठार झाला. मोगलानी शेरहाजी बुरुजही दारूगोळ्यांनी उडवून दिला.परंतु मुघल सैन्याला किल्ल्यात प्रवेश करता आला नाही.मोठी हातघाई झाली.यात मुरार जगदेव चा भाऊ ठार झाला.मोगंलाची मोठी हानी झाली त्यामुळे शहजादा माघार घेऊन बुरहाणपुरला परत गेला.या लढाईत मोंगल सैनयाचे प्रचंड हानी व नरसंहार झाला.म्हणुन या किल्ल्यावर लढाई झाली नाही असे म्हणता येणार नाही,व किल्याला रंडका किल्ला पण म्हणता येणार नाही.