१ मे महाराष्ट्र दिन
𖣘 दि.१ मे २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3vyutbH
'मंगल देशा, पवित्र देशा.... प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा' असं म्हणत आज बुधवारी म्हणजेच १ मे या दिवशी सर्वत्र महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो. अशा याच दिवशी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवसही साजरा केला जातो.
१९५६ च्या States Re-organisation Act नुसार भारतातील राज्यांच्या सीमा या भाषेच्या आधारे निर्धारित करण्यात आल्या होत्या. ज्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीकडून मुंबईसह वेगळ्या महाराष्ट्राची मागणी करण्यात आली. ज्यामध्ये मराठी, कोकणी भाषिकांचा समावेश असेल. तर, गुजराती आणि कच्छी भाषिक जनतेसाठी वेगळ्या राज्चयाची मागणी करण्यात आली. याच मागण्या आणि आंदगोलनांच्या बळावर अखेर १ मे १९६० मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. म्हणूनच महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते २१ नोव्हेंबर इ.स.१९५६ च्या तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचं वातावरण होतं. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. या निर्णयाचा सर्वच स्तरांतून आणि अनेक लहानमोठ्या सभांमधून जळजळीत निषेध करण्यात येत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट दुपारनंतर, म्हणजेच मुंबईतल्या शंभर- सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची कामाची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चे निघाले. फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी करण्यात आली होती. कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलं होतं. पण, जमावबंदीला झुगारून मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यांना उधळून लावण्यासाठी लाठीमारही करण्यात आला. पण, तरीही ते चौकातून हटत नव्हते अखेर पोलिसांना त्यांच्यावर गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घालण्याचे पोलिसांना आदेश होते. परिणामी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी १९५७ पर्यंत जे १०६ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमतं घेत १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली.म्हणुन आपण १ मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो." महाराष्ट्रा"बाबत माहिती
______________________
👉 स्थापना-01 मे 1960
👉 राज्यभाषा - मराठी
👉 एकूण तालुके-353
👉 पंचायत समित्या 351
👉 एकूण जिल्हा परिषद-33
👉 आमदार विधानसभा 288
👉 आमदार विधानपरीषद 78
👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉 सुमद्रकिनारा-720 किमी
👉 नगरपालिका- 230
👉 महानगरपालिका-26
👉 शहरी भाग - 45%
👉 ग्रामीण भाग 55%
👉 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
👉 क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
👉 संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
👉 सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर
👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
👉 महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली )
👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
👉 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई
👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!
____________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ 9890875498 ☜♡☞
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________