Top News

खासदार बाळू धानोरकर निधन : पार्थिव थेट वरोरा येथे दाखल | MP Balu Dhanorkar

आज वरोरा येथे अंत्यदर्शन उद्या अंत्यसंस्कार समर्पित सेना कार्यकर्ता ते काँग्रेस खासदार केला प्रवास Congress’s only Lok Sabha MP from Maharas...

ads

रविवार, मे २३, २०२१

प्राचीन शनि मंदिर-रोम

   प्राचीन शनि मंदिर-रोम

फेसबुक लिंक http://bit.ly/2T6U4KJ  

रोम ही इटली देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.इटलीच्या मध्य-पश्चिम भागात लात्सियो प्रांतामध्ये तिबेर व ऍनियेन नद्यांच्या संगमावर वसलेल्या रोम शहराला अतिप्राचीन इतिहास आहे. इ.स. पूर्व ८व्या शतकापासूनच्या लिखित इतिहासात रोमचा उल्लेख आहे. एका नोंदीनुसार रोमची स्थापना एप्रिल २१, इ.स.पूर्व ७५३ रोजी करण्यात आली होती. ऐतिहासिक रोमन साम्राज्याची राजधानी रोम येथेच होती.
दुसर्‍या शतकापासून पोपचे वास्तव्य रोम शहरामध्ये राहिले आहे. १९२९ साली स्थापन झालेला व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान देश पूर्णपणे रोम शहराच्या अंतर्गत आहे.

प्राचीन शनि मंदिर-रोम

केवळ भारतीय संस्कृतीमध्येच शनीची मंदिरे किंवा उपासना आहे असे नाही. प्राचीन रोमन साम्राज्यातही शनीची उपासना होत असे. रोममध्ये इसवी सनाच्या चौथ्या शतकातील एक शनी मंदिर आहे. अर्थात सध्या त्याचे भग्‍नावशेषच शिल्‍लक आहेत.रोमन साम्राज्यात ग्रीक देवता क्रोनास आणि रोममधील शनी देवता ‘सॅटर्न’ ही एकच मानली जात असत. ‘सॅटर्न’ ही रोमन देवता कृषी व्यवसायाशी संबंधित होती. सॅटर्नच्या चित्रांमध्ये त्याला कृषिदेवता म्हणूनच दर्शवले जाते. दरवर्षी तिथे शनी देवतेचा एक उत्सव १७ डिसेंबरला साजरा केला जातो. त्याला ‘सॅटर्नालिया’ असे म्हणतात. हा रोमन कॅलेंडरमधील एक महत्त्वाचा सण होता.भारतीय संस्कृतीमध्ये अनेक ग्रह तसेच नद्यांच्याही अधिष्ठात्री देवता मानल्या जातात. देशात नवग्रहांची प्राचीन काळापासूनच उपासना केली जाते. त्यातही शनी देवतेला ‘न्याय’ करणारी देवता मानले जाते. ज्याच्या त्याच्या पाप-पुण्याची फळे शनीदेव भोगण्यास देत असतो व त्याच्या पूजेसाठी देशात अनेक ठिकाणी शनी मंदिरे आहेत.   अनेक ऐतिहासिक पुस्तकांमध्ये त्याचा उल्‍लेख मिळतो. सॅटर्न मंदिर रोमन फोरमच्या ईशान्येकडे आहे. सध्या या मंदिराचे आठ विशाल स्तंभच तिथे पाहायला मिळतात. हे स्तंभ इजिप्‍तमधील ग्रॅनाईटपासून बनवलेले आहेत. मंदिराचा काही भाग थेशियन संगमरवराचा होता. तिथे प्राचीन शैलीतील कलाकुसरही पाहायला मिळते. या मंदिराचा कालौघात अनेकवेळा जीणोद्धार झाला होता. अनेक वेगवेगळ्या शासकांच्या काळात हा जीर्णोद्धार झाला.यूरोप खंडात वृद्धिंगत पावलेली एक विकसित व वैभवशाली संस्कृती. आधुनिक यूरोपीय संस्कृतींचा मूळ स्त्रोत असण्याचा ज्या विविध संस्कृतींना मान मिळतो, त्यांत ग्रीक व रोमन संस्कृती प्रधान आहेत. यात रोमची खास अशी देणगी म्हणजे सर्वगामी शासनसंघटना, तिला आधारभूत अशी विस्तृत विधिसंहिता आणि अर्थव्यवस्था होय.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.