बुलेट निर्माण करणारया कंपनिची स्कुटर देखिल होती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ मे २०२१

बुलेट निर्माण करणारया कंपनिची स्कुटर देखिल होती

"बुलेट" निर्माण करणारया कंपनिची स्कुटर देखिल होती  

🛵  🛵  🛵  🛵  🛵

फेसबुक लिंक http://bit.ly/3oPQEYH
धकधक आवाज करत जाणारी बुलेट रस्त्यावरून चालली की अनेकांच्या नजरा तिकडे वळतात.इतर मोटरसायकलच्या तुलनेत अवाढ्य असणाऱ्या बुलेटकडे पाहुन आपण कल्पनाहि करणार नाही की,बुलेट मोटसायकल बनवणाऱ्या कंपनिची स्कुटर होती ते.
"बुलेट" निर्माण करणारया कंपनिची स्कुटर देखिल होती

बुलेट बनवणाऱ्या एनफिल्ड कंपनिने "फैन्टैब्युलस" नावाची स्कुटर १९६२ मध्ये रस्त्यावर आणली होती.,स्कुटरचे नाव "फैन्टैब्युलस" असे होते."
फैन्टैब्युलस" म्हणजे मराठीत "अत्युत्तम".
तो काळ असा होता की, स्कुटर असणे हे प्रतिष्ठीचे लक्षण समजले जात असे. तो स्वस्ताईचा काळ होता. त्यावेळी पेट्रोल दर दीड रूपया लिटर होता.सामान्य माणसाला त्यावेळी पगार पण तटपुंजा म्हणजे ६० रूपये होता.(उदा.सरकारी खात्यातल्या शिपायास) स्कुटर, मोटरसायकल खरेदी करणे म्हणजे आवाक्याच्या बाहेरील गोष्ट होती.सायकल खरेदी म्हणजे चैन समजली जात होती.फायनान्स वैगेरे कोणालाच माहित नव्हता.
अशा काळात ही स्कुटर बाजारात आली होती. 
                 १७५ सीसीचं २-स्ट्रोक इंजिन या स्कूटरमध्ये होतं. हे इंजिन ७.५ हॉर्सपॉवरची शक्ती निर्माण करत होतं.ही‌‌ स्कूटर ताशी ९६.५ की.मी या सर्वोच्च वेगानं धावू शकत होती. या स्कूटरमध्ये इलेक्ट्रीक स्टार्टरही होता.मागे स्टेपनी होती.सीटखाली पेट्रोल टाकी होती.पुढे आरामात पाय सोडायला जागा होती.  एनफिल्ड कंपनी इंग्लंडहुन इंजिन मागवुन घेऊन मद्रास मध्ये स्कुटर बनवत असे.बजाज स्कुटरचा जमाना अजुन यायचा होता.या स्कुटरला स्पर्धक म्हणुन "लॅम्ब्रेडा" बाजारात होती.बरोबरीने "व्हेस्पाही" होती.पण एनफिल्ड कंपनिची ही स्कुटर बाजारात म्हणावी तितकी चालली नाही.त्यामुळे १९७० मध्ये कंपनीनं तीची निर्मिती थांबवली.व "बुलेट" या लोकप्रिय माॅडेलवर लक्ष केंद्रित केले.आज ही स्कुटर मोजक्याच हौशी लोकाकडे आहे.
अनिल पाटील पेठवडगाव
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9890875498 ✺
                 ❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------

बुलेट निर्माण करणारया कंपनिची स्कुटर देखिल होती,There was also a scooter from the company that made the "bullets"

----------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------
There was also a scooter from the company that made the "bullets"

🛵 🛵 🛵

Many people turn their eyes to the bullets that make loud noises on the road. Looking at the bullets which are huge compared to other motorcycles, you would not even imagine that the bullets were the scooters of the motorcycle manufacturing company.
The Enfield company which manufactures bullets had brought a scooter named "Fantabulus" on the road in 1962. , the name of the scooter was "Fantabulus". "Fantabulus" means "excellent" in Marathi.
                 The scooter had a 175 cc 2-stroke engine. The engine was producing 7.5 horsepower. The scooter could run at a top speed of 96.5 kmph. The scooter also had an electric starter. The Enfield company used to order engines from England to make scooters in Madras. The era of Bajaj scooters was yet to come. No. So the company stopped production in 1970 and focused on the popular "Bullet" model. Today, the scooter is only available to a few enthusiasts.
Anil Patil Pethwadgaon
𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9890875498
                 ❍ Mahiti sevae Group
Pethwadgaon, Dist. Kolhapur
----------------------------------------